JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला मोठी गळती, लाखो लीटर पाणी वाया

VIDEO : सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला मोठी गळती, लाखो लीटर पाणी वाया

आज पाईपलाईनला गळती लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 8 सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला मोठी गळती लागल्याचे समोर आले आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तसेच या गळतीचे थरारक दृश्य मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला मोठी गळती लागल्याचे समोर आले आहे. ही घटना शिवडे पांडुर्ली रस्त्यावरील आहे. दरम्यान, या पाईपलाईनला मोठी गळती लागल्याने आजूबाजूच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेले आहे. तसेच यामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली.

संबंधित बातम्या

आज पाईपलाईनला गळती लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही पाईपलाईन इगतपुरी परिसरात असलेल्या कडवा धरणातून थेट सिन्नरपर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान, याचवर्षी फेब्रुवारी महिन्यातही सिन्नर शहरा पाणीपुरवठा करणाऱ्या एका पाईपलाईनला गळती लागल्याची घटना समोर आली होती. हेही वाचा -  Nashik : फिरत्या तलावात करा बाप्पाचे विसर्जन, गर्दी टाळण्यासाठी ‘या’ नंबरवर करा कॉल मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प - मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याला आज दुपारनंतर पुन्हा एकदा पावसाने झोडपलं आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाहूर ते विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर परिणाम बघायला मिळाला आहे. विशेष म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी पावसाने घोळ घातल्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसानं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. दुपारपासून ऊन आणि अचानक संध्याकाळी आलेल्या पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या