JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वडिलांच्या मेहनतीचं चीज! रिक्षाचालकाच्या मुलाचं UPSC मध्ये घवघवीत यश

वडिलांच्या मेहनतीचं चीज! रिक्षाचालकाच्या मुलाचं UPSC मध्ये घवघवीत यश

स्वप्नील पवारचे वडील रिक्षाचालक आहेत. त्यामुळे घरची परिस्थिती ही बेताचीच.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 16 डिसेंबर : अनेकदा घरची परिस्थिती साधारण असताना, घरातील कुणी नोकरीला नसताना हालाखीच्या परिस्थितीतूनही अनेकजण आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मेहनतीने जिद्दीने आपली स्वप्न पूर्ण करतात. नाशिकच्या एका तरुणाने अशी प्रेरणादायी कामगिरी करुन दाखवली आहे. स्वप्नील पवार असे तरुणाचे नाव आहे. स्वप्नील पवारचे वडील रिक्षाचालक आहेत. त्यामुळे घरची परिस्थिती ही बेताचीच. मात्र, असे असूनही स्वप्नीप पवार या तरुणाने देशातील सर्वात कठीण परिक्षा समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. नाशिकच्या द्वारका येथील स्वप्नील पवारने यंदाच्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. मे महिन्यात लागलेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालात स्वप्नीलने सर्वांची मान उंचावत 418वी रँक मिळवली. त्याचे वडील जगन्नाथ पवार हे रिक्षाचालक आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास स्वप्नीलने यूपीएससी परिक्षेचा प्रवास पूर्ण केला. स्वप्नील हा शालेय जीवनापासून अभ्यासात हुशार आहे. त्याने दहावीला पेठे विद्यालयात शिक्षण घेऊन 93 टक्के मिळवले. दरम्यान, पुढचे शिक्षण घेताना अनेक आर्थिक अडचणी आल्यात. मात्र, त्याने त्या सर्व अडचणींवर मात करत आपला प्रवास सुरू ठेवला. हेही वाचा -  जळगावातील शिपाई पाटलाचा लेक झाला सैन्यदलात अधिकारी, आईचाही ऊर आला भरुन! स्वप्नीलने केटीएचएम महाविद्यालयातून बारावीची परीक्षा पास करत जेईई परीक्षेच्‍या माध्यमातून पुण्यातील विश्‍वकर्मा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळविला. केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करताना प्‍लेसमेंटच्‍या माध्यमातून त्यांनी फॅब्‍स इंटरनॅशनलमध्ये प्रकल्‍प अभियंता म्‍हणून काम पाहिले. उपलब्‍ध संसाधनांचा योग्‍य वापर करता आला पाहिजे. तसेच 24 तास अभ्यासात व्‍यस्‍त राहाण्यापेक्षा वेळेचे योग्‍य व्‍यवस्‍थापन करत कमी वेळ पण प्रभावी पद्धतीने उमेदवारांनी अभ्यास करावा, असा सल्ला यूपीएससी उमेदवारांना स्वप्नील देतो. नोकरीच्या कालावधीमध्ये त्यांनी दिवसभर नोकरी करायची आणि मिळेल त्‍या वेळेत अभ्यास करायचा, अशा प्रवास सुरू ठेवला. अभ्यासात सातत्य ठेवून त्यांनी पहिल्‍याच प्रयत्‍नात यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. मात्र, यावेळी त्यांची रँक ही 632 आली होती. रँक कमी आली. त्यामुळे पुन्हा एकदा परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पहिल्यांदा यूपीएससी पास झाल्यानंतर स्वप्नील पवार याला इंडियन रेल्वे सर्व्हिस मिळाली. याच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यानच दुसऱ्यांदा यूपीएससी परिक्षा पास करत त्याने यूपीएससी परिक्षेत 418 वी रँक मिळवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या