नाशिक, 9 ऑगस्ट : कोणाचा मृत्यू कधी ओढवेल, हे कोणीच सांगू शकत नाही. अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. ‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमात एका माजी सैनिकाचा मृत्यू ओढवल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यात राष्ट्रगीत म्हणत असताना माजी सैनिक खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रगीत सुरू असतानाच चंद्रभान मालुंजकर माजी सैनिक जमिनीवर कोसळले. आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
India@75 : ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या ‘या’ 5 महिलांचं कार्य देश कधीच विसरू शकणार नाही
चंद्रभान मालुंजकर 1962 च्या युद्धात सहभागी झाले होते. नाशिकमधील संदीपगर येथील शाळेत सोमवारी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आझादीका अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. मौले सभागृहात कार्यक्रमावेळी शाळेच्या परिसरात सकाळी 9 वाजता प्रभातफेरी काढण्यात आली होती.
India@75 : 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणात काय फरक आहे? अनेकांना उत्तर माहीत नसणार
यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना अचानक ते खाली कोसळले. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Video पाहण्यासाठी
क्लिक करा
मालुंजकर यांनी निवृत्तीनंतर सातपूर परिसरात माजी सैनिक संघटनांच्या माध्यमातून नव तरुणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.