JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिकमध्ये असा ही एक आशिक ! तब्बल १२० देशांमधील नाण्यांचा आणि नोटांचा केला संग्रह

नाशिकमध्ये असा ही एक आशिक ! तब्बल १२० देशांमधील नाण्यांचा आणि नोटांचा केला संग्रह

नाशिक मध्ये (Nashik) एका अवलियाची खूपच चर्चा आहे. ते आहेत संजय नायर (Sanjay Nair) या महाशयांचा छंद बघून भले भले हैराण झालेत

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विठ्ठल भाडमुखे ; नाशिक २५ मे : छंद (Hobby) म्हटल की, कोणाला कशाचा असेल याचा काही नेम नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारचे अवलिया आपल्याला बघायला मिळतात.पण सद्या नाशकात (Nashik) एका अवलियाची खूपच चर्चा आहे. ते आहेत संजय नायर (Sanjay Nair) या महाशयांचा छंद बघून भले भले हैराण झालेत, यांना दुसरा तिसरा काही नाही तर, वेगवेगळ्या देशांमधील जुन्या नोटा, नाने, स्टॅम्प गोळा करण्याचा छंद (Hobby) आहे.या महाशयांनी आतापर्यंत तब्बल १२० विविध देशांमधील (Country) जुन्या नोटा, नाणे,स्टॅम्पचा संग्रह केला आहे. संजय नाणे हे नाशिकच्या प्रशांत नगर भागात राहतात. ते एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतात. मात्र नोकरी सांभाळत फावल्या वेळेत ते आपला छंद जोपासत असतात. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, श्रीलंका, चीन, पाकिस्थान, नेपाळ, भूतान, सिंगापूर, इंडोनेशिया, स्वीडन, यांसारख्या तब्बल १२० देशांची नाणी, आणि नोटांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. इतकचं काय तर जवळपास १५ देशांचे स्टॅम्पचा, किचनचा ही संग्रह त्यांच्याकडे आहे. हे ही वाचा : अभिमानास्पद! 26 वर्षीय कॅप्टन अभिलाषा आर्मीतल्या पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर चालक, लष्कराने केला असा सन्मान हे सर्व सांभाळत असताना त्यांना पेंटिंगचा ही नाद आहे. ते उत्तम चित्रकार देखील आहेत. बर आता तुम्ही म्हणाल की ही सर्व नाणी, नोटा त्यांनी विकत घेतल्या का ? तर नाही, हा सर्व संग्रह त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने जमवला आहे. म्हणजे बाहेर देशात असणारे मित्र किंवा परदेशात फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांकडून घेऊन त्यांनी हा संग्रह केला आहे. हे ही वाचा :  Yashwant Jadhav: शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी संजय नायर यांच्या घरात जेव्हा आपण जातो,तेव्हा अगदीच प्रसन्न वाटत,त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ पेंटिंग प्रथमतः आपल लक्ष वेधून घेतात.पण त्यांना हा संग्रह करण्यासाठी खूप कष्ट उपसावे लागले आहेत.जवळपास २० वर्षे त्यांना हे जमा करण्यासाठी लागले आहेत. त्यामुळे संजय नायर यांचा हा छंद बघून,नक्कीच कौतुक करावास वाटत,मात्र त्यांना इतक्या वरच थांबायचं नाहीयेत तर अजून १२० देशांचे त्यांना नाणे,नोटा यांचा संग्रह करायचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या