Home /News /mumbai /

Yashwant Jadhav: शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

Yashwant Jadhav: शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या अडचणीत वाढ, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या अडचणीत वाढ, इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

Yashwant Jadhav: शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.

    मुंबई, 25 मे : शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी (Income Tax raid) करण्यात आल्यानंतर आता ईडी (ED)चा ससेमीरा मागे लागण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स विभागाकडून यशवंत जाधव यांचे घर, मालमत्तावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडून समन्स आल्याने यशवंत जाधव अडचणीत येताना दिसत आहेत. (ED summons Shiv Sena leader Yashwant Jadhav) मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव यांना फेमा अंतर्गत ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीकडून आता यशवंत जाधवांच्या परदेशातील गुंतवणुकींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यशवंत जाधवांच्या संपत्तीची संख्या 36 वरून पोहोचली 53 वर यशवंत जाधव यांच्या संपत्तीची आणखी एक माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. आयकर विभागाने केलेल्या चौकशीतून यशवंत जाधव यांची संपत्ती आता 36 वरून 53 वर पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत जाधव प्रकरणात आयकर खात्याच्या चौकशीत आणखी काही बाबी उघड झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत तपासाला वेग आला आहे. यशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 झाली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणून ही खरेदी, या एकट्या इमारतीतून 80 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांत आयकर खात्याने या ठिकाणी जाऊन तपासणी आणि खातरजमा केली. यात काही व्यक्तींनी शपथेवर कबुलीनामा दिला आहे. काही ज्वेलर्सकडून 6 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केले. ही संपूर्ण रक्कम रोखीने अदा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात एक मध्यस्थामार्फत 1.77 कोटींच्या दागिन्यांची खरेदी केली होती. यासाठी रोखीने पैसे स्वीकारल्याची त्या ज्वेलर्सने कबुली दिली आहे. बिलाकाडी चेंबर्समध्ये 3 खोल्यांचे टेनन्सी राईटस खरेदी करण्यासाठी 1.15 कोटी रुपये रोखीने दिल्याचेही उघड झाले आहे. तसंच कोरोनेशन बिल्डिंग, झैनाब महाल आणि कैसर बिल्डिंगमध्ये अचल संपत्ती हस्तांतरणासाठी 3 कोटींहून अधिक रक्कम रोखीने खरेदी केल्याचे समोर आले आहे. आणखी रोख रकमेच्या व्यवहारांचा तपास सुरू आहे. एकूण संपत्तींची संख्या आता 36 वरून 53 वर पोहोचली आहे. पाच कोटींच्या फ्लॅटसह 40 मालमत्तेवर टाच यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. आयकर विभागाकडून या मालमत्तेवर टाच आली आहे. यामध्ये यशवंत जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅट आहे. 25 फेब्रुवारीला आयकर विभागानं माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या या तपाासदरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आणण्यात आली आहे. यशवंत जाधव यांचे भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आले आहेत त्यापैकी 26 फ्लॅट Newshawk Multimedia Pvt Ltd कंपनीच्या नावे नोंद आहेत. Newshawk Multimedia Pvt Ltd. कंपनीच्या नावे या भाडेकरुंना थेट रोख रक्कम देण्यात आली होती. याशिवाय भायखळामधील इम्पिरियल क्राउन हॉटेल आहे जे यशवंत जाधव यांनी आपल्या सासूच्या नावे खरेदी केलं होतं. वांद्रे येथील फ्लॅट आणि याशिवाय यशवंत जाधव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हाताळणाऱ्या 14 संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: ED, Mumbai, Shiv sena

    पुढील बातम्या