JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : 77 वर्षांच्या आजीबाईंनी स्विमिंगमध्ये पटकावले 3 गोल्ड आणि 2 सिल्व्हर! पाहा Video

Nashik : 77 वर्षांच्या आजीबाईंनी स्विमिंगमध्ये पटकावले 3 गोल्ड आणि 2 सिल्व्हर! पाहा Video

मनात काही करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर त्याला वयाचा अडथळा येत नाही, हे नाशिकच्या 77 वर्षांच्या आजीबाईंनी दाखवून दिले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 20 ऑक्टोंबर :  पन्नाशी ओलांडली की अनेकांना निवृत्तीचे वेध लागतात. मी आता काहीच करू शकत नाही, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. पण, मनात काही करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर त्याला वयाचा अडथळा येत नाही, हे नाशिक च्या 77 वर्षांच्या आजीबाईंनी दाखवून  दिले आहे, या आजींनी राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत 3 गोल्ड आणि 2 सिल्व्हर मेडलची कमाई केलीय. त्यांचा हा प्रवास तरूणांनाही प्रेरणादायी आहे. कुणालाही न सांगता सराव! जयंती काळे असं या नाशिकच्या आजींचे नाव आहे. त्यांना दुसरीत असतानाच पोहण्याचा छंद जडला होता. विहीर किंवा नदीमध्ये त्या अगदी सहज पोहत. त्यामधून त्यांना पोहण्याची आवड निर्माण झाली.  जयंती यांचे वडील सरकारी नोकरी करत असल्यामुळे,त्यांची सतत बदली व्हायची,मात्र जिथं बदली झाली तिथं त्यांचा सराव सुरू असे. जयंती यांना मुलगी असल्यानं त्या काळात पोहण्यासाठी अनेक अडचणी होत्या. ‘तू कशाला पाण्यात पोहतेस? असं म्हणून घरचे रागवत. त्यानंतरही त्यांनी हा सराव सोडला नाही. घरी कुणालाही न सांगता त्या गुपचूप नदीवर जाऊन पोहत असत. नाशिकची लेक जगात भारी! 14 व्या वर्षीच मिळवली 2 आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची डॉक्टरेट, Video सासूनं शेतात नेलं आणि विहिरीत उडी मारली! जयंती यांना पोहण्याची सवय लागली होती. घरामध्ये अनेक बंधनं होती, तरीही त्यांच्या पोहण्यात खंड पडला नाही. मुलीचं हे पोहणं लग्नानंतर तरी सुटेल, या समजुतीमधून घरच्यांनी त्यांचे लग्न लावले. लग्नानंतर त्या सासूसोबत काम करण्यासाठी शेतामध्ये गेल्या. ‘शेतामध्ये विहीर दिसताच जयंती यांनी त्यामध्ये उडी मारली. सुनेनं विहिरीत उडी मारली म्हणून सासूबाई ओरडायला लागल्या. आपण सुनेला विहिरीत ढकलून दिलं, असं लोकं म्हणतील अशी त्यांना भीती होती. तू बाहेर ये, असा त्यांचा आग्रह होता. त्यावेळी मला पोहता येतं, असं मी सासूबाईंना सांगितलं. त्यावेळी त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.’ अशी भन्नाट आठवण जयंती यांनी सांगितली आहे. या घटनेनंतर त्यांच्या पोहण्यात कधीही खंड पडला नाही. Video : अपूर्ण स्वप्नाला मिळाले पतीचे बळ, शून्यातून सुरुवात करत बनली 4 कंपन्यांची मालकीण आंतरराष्ट्रीय पदकाचे ध्येय जयंती नाशिक शहरातील जलतरण तलावात स्विमिंगसाठी येत. त्यावेळी स्विमिंग कोच हरी सोनकांबळे यांच्याशी त्यांची ओळख झाली. सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सरावाला सुरूवात केली. त्याचा लवकरच परिणाम झाला. त्यांनी विविध ठिकाणी पदकांची लयलूट केली. राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी 3 गोल्ड आणि 2 सिल्व्हर मेडलची कमाई केली. वयाच्या 77 व्या वर्षी देखील झोकून देऊन सराव करणाऱ्या जयंती काळे या इतर खेळाडूंसाठीही प्रेरणा बनल्या आहेत. या वयातही कोचनी सांगितलेलं त्या सहज आत्मसात करतात. महाराष्ट्राला त्यांनी गोल्ड मेडल मिळवून दिल्यानं खूप आनंद झाला आहे. त्या आणखी चांगली कामगिरी करतील असा विश्वास आहे. त्यांच्यापासून इतर तरूणांनीही प्रेरणा घ्यावी अशी प्रतिक्रिया स्विमिंग कोच हरी सोनकांबळे यांनी व्यक्त केली आहे. तब्बल 1 कोटींचं पॅकेज नाकारून तिनं सुरु केला स्वतःचा बिझनेस; आज आहे 80,000 कोटींची उलाढाल राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता जयंती काळे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्रात होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य आपण नक्की पूर्ण करू असा विश्वास जयंती यांनी व्यक्त केलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या