JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / स्विमिंग पुलमध्ये पडला चिमुकला; बाहेर येण्याचा प्रयत्न करत राहिला, पण शेवटी हारला, हृदय पिळवटणारा VIDEO

स्विमिंग पुलमध्ये पडला चिमुकला; बाहेर येण्याचा प्रयत्न करत राहिला, पण शेवटी हारला, हृदय पिळवटणारा VIDEO

आपल्या शिवबा आणि वैष्णवी या दोन जुळ्या मुलांसोबत ते लोणावळा परिसरात याच मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. यावेळी दोन मुलांपैकी शिवबा याचा स्विमिंग पुलमध्ये पडून मृत्यू झाला

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक 19 जुलै : स्विमिंग पुलमध्ये पडून 2 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणावळा परिसरात घडली आहे. नाशिकमध्ये राहाणारे अखिल पवार हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत 12 जुलै रोजी लोणावळा येथे गेले होते. आपल्या शिवबा आणि वैष्णवी या दोन जुळ्या मुलांसोबत ते लोणावळा परिसरात याच मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. यावेळी दोन मुलांपैकी शिवबा याचा स्विमिंग पुलमध्ये पडून मृत्यू झाला (2 Year Old Boy Drowns in Swimming Pool). शाळेत सोडणे राहून गेले, ट्रकच्या धडकेमध्ये बाप-लेकीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू हे कुटुंबीय लोणावळा येथीस खासगी बंगल्यात राहाण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे. आई-वडील आणि इतर कुटुंबीय चेकइन करण्यात व्यस्त असताना शिवबा हा लहान मुलगा खेळत खेळत स्विमिंग पुलजवळ पोहोचला. मात्र, यावेळी अचानक तो स्विमिंग पुलमध्ये कोसळला. याच घटनेत त्याचा मृत्यू झाला. एकाच कंपनीत काम करायचे, शेजारी राहायचे पण एक दिवस…; पुण्यात शेजाऱ्याकडून 65 वर्षीय महिलेची हत्या मन हेलावून टाकणारा हा सगळा प्रकार या बंगल्याच्या CCTV मध्ये कैद झाला आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान ही घटना बंगल्याच्या केअर टेकर आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप मृत मुलाच्या वडिलांनी केला आहे. तर आपली मुलं जोपर्यंत समजदार होत नाही तोपर्यंत त्यांना अशा ठिकाणी घेऊन जाऊ नये, असं आवहान मृत मुलाच्या आईने केलं आहे. वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या