लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 02 फेब्रुवारी : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य…अर्थात सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करणं असा त्याचा अर्थ.. मात्र, नाशिक शहरातील एका पोलिसानं खाकी वर्दीला कलंक लावला आहे. बिलाचे पैसे मागितले म्हणून भगवान जाधव नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क बार मालकाला मारहाण केली. भगवान जाधव नावाच्या या पोलिसानं बार मालक भास्कर शेट्टीला मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे या पोलिसासोबत स्थानिक गुडं पप्पू कांबळेही या चित्रफितीत दिसत आहे. त्या दोघांनी बार मालकाला जबर मारहाण केली. त्यांची ही गुंडगिरी बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
लेखा नगर येथील हॉटेल स्पॅक्समध्ये पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधव हा त्याच्या साथीदारांसोबत बिअर घेण्यासाठी गेला होता. बिअर घेतल्यानंतर बारचालक भास्कर येतप्पा शेट्टी याने जाधवकडे पैशाची मागणी केली. मात्र, मी पोलीस असून तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणत शिवीगाळ केली. इतकंच नाहीतर पोलीस एकनाथ जाधव आणि त्याचा साथीदार पप्पू कांबळे याने शेट्टी यास मारहाण देखील केली. घटनेनंतर बारचालक शेट्टी याने अंबड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी बार मालकाने नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याऐवजी पोलीसचं जर गुन्हेगाराच्या मदतीनं गुंडगिरी करत असतील तर सामन्यांनी कुणाकडं दाद मागायची असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. त्यामुळे आता नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील अशा प्रकारांना आळा घालतील का? असा सवाल जनतेकडून विचारला जातोय. पोलिसाची गुंडगिरी, तक्रार करणाऱ्या तरुणाचीच केली धुलाई, VIDEO VIRAL दरम्यान, दबंगिरी करणाऱ्यांना बेड्या ठोकणारा पोलीस अधिकारी दादागिरी करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा पोलीस अधिकारी दादागिरी करून तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशातील भदोही इथे पोलिसांची दबंगिरी समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी न्याया मागायला कुणाकडे जायचा असा सवाल उपस्थित होत आहे. जमीनीचा वाद घेऊन तरुण पोलिसांकडे आला मात्र पोलीस अधिकाऱ्याने तो वाद सोडवण्याऐवजी दादागिरी करत तरुणालाच बेदम मारहाण केली. पोलिसांनी तरुणासोबत केलेलं गैरवर्तन मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी दमदाटी केली आणि त्याच्याकडून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी तात्काळ कठोर कारवाई केली आहे.
जमिनीचा वाद सोडवण्यासाठी तरुण भदोही इथल्या पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी वाद सोडवण्याऐवजी अरेरावीची भाषा केली. त्यामुळे वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी चौकशी करून पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहे. पीडित तरुणाची तक्रार ऐकून न घेता अशा पद्धतीनं पोलिसाने केलेल्या गैरवर्तवणुकीमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.