JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO| ब्रेकअप केल्याच्या रागातून पेट्रोलपंपावर तरुणीवर जीवघेणा हल्ला

VIDEO| ब्रेकअप केल्याच्या रागातून पेट्रोलपंपावर तरुणीवर जीवघेणा हल्ला

हल्ला करणारा तरुण आणि महिलेत प्रेम संबंध होते. मात्र या महिलेने या तरुणासोबत राहण्यास नकार दिल्याने त्याने हा हल्ला केल्याच समोर आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, नाशिक, २६ ऑगस्ट : तरुणीनं रिलेशनमध्ये राहण्यासाठी नकार दिल्याने तिला चारचौघात जीवघेणी मारहाण करून संपवण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकचा पाथर्डी फाटा परिसरात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेवर तिचाच मित्राने खुनी हल्ला केल्याची घटना समोर आली. हल्ला करणारा तरुण आणि महिलेत प्रेम संबंध होते. मात्र या महिलेने या तरुणासोबत राहण्यास नकार दिल्याने त्याने हा हल्ला केल्याच समोर आला आहे.नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली.

संबंधित बातम्या

धक्कादायक! जिथे चोरी करायला गेला तिथेच मिळाली मृत्यूची शिक्षा जाधव पेट्रोलियम इथे काम करणाऱ्या जुबेदा युसूफ खान या ३७ वर्षीय महिलेवर प्रेम असलेल्या प्रमोद प्रकाश गोसावीने खुनी हल्ला केला. जुबेदा खान आणि प्रमोद गोसावी यांच्यात गेल्या एक वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र एका बलात्काराच्या गुन्ह्यात प्रमोद गोसावी याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. याच रागातून सदर संशयित आरोपीने या महिलेला ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन याचा जाब विचारत खुनी हल्ला केला. भरदिवसा घडलेला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर जखमी महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात या महिलेच्या डोक्यावर आणि पायावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तिला पुढील उपचारासाठी पेट्रोल पंप व्यवस्थापनाने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या