JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महिलेला जंगलात नेऊन साडीने बांधले अन् 3 दिवस केले अत्याचार, अमरावती हादरली

महिलेला जंगलात नेऊन साडीने बांधले अन् 3 दिवस केले अत्याचार, अमरावती हादरली

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी हिरालाल जामुनकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, आरोपीच शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जाहिरात

चिखलदरा पोलीस स्टेशन

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 15 डिसेंबर, संजय शेंडे : जिल्ह्यातील चिखलदरामधून धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका पंचवीस वर्षीय महिलेचे साडीने हातपाय बांधून तिच्यावर जंगलामध्ये अत्याचार करण्यात आला आहे. चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपीने महिलेवर तीन दिवस रात्रीच्या सुमारास अत्याचार केला. या महिलेने कशीबशी आरोपीच्या तावडीतून आपली सुटका करत पोलीस स्टेशन गाठलं. महिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हिरालाल जामुनकर असं या आरोपीचं नाव असून, गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जंगलातील झुडपात लपवले   घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  एका पंचवीस वर्षीय महिलेवर  चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार करण्यात आला आहे. पीडित महिला मजुरी कामासाठी घराबाहेर निघाली होती. दरम्यान आरोपी हिरालाल जामूनकर  याने तिला रस्त्यात अडवले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने जंगलात नेले. तिथे आरोपीने या महिलेचे हातपाय  साडीने बांधून तिला जंगलातील झुडपात लपवले. त्यानंतर सतत तीन दिवस आरोपीने तिथे येऊन रात्रीच्या वेळेस पीडितेवर बलात्कार केला.  या नाराधमाच्या तावडीतून पीडित महिलेने कशीबशी आपली सुटका केली. त्यानंतर तीने पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. हेही वाचा :   पहिल्या बायकोसोबत मिळून रचला दुसऱ्या बायकोला मारण्याचा प्लान, पण एक चुक आणि खेळ खल्लास आरोपी फरार  महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी हिरालाल जामुनकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, आरोपीच शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या