JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shivsena VS Shinde : धनुष्यबाण कुणाचं? निवडणूक आयोगाच्या निकालाआधी पवारांचा शिवसेना आणि शिंदेंना सल्ला

Shivsena VS Shinde : धनुष्यबाण कुणाचं? निवडणूक आयोगाच्या निकालाआधी पवारांचा शिवसेना आणि शिंदेंना सल्ला

‘शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे.’

जाहिरात

'शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे.'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 08 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाला? याचा फैसला आता निवडणूक आयोगाकडे होणार आहे. ‘निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो दोन्ही पक्षाने मान्य करावा’ असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. तसंच, शिवसेना आणि शिंदे गटाला सल्लाही दिला. ‘शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. धनुष्यबाणावर निर्णय निवडणूक आयोगाला द्यायचा आहे, निवडणूक आयोगाचा जो निर्णय असेल तो दोन्ही पक्षाने मान्य करावा, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेना आणि शिंदे गटाला दिला आहे. (ठाकरे गटाला धक्का, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 8 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात) ज्या समाजाने भूतकाळामध्ये वर्णव्यवस्थेतील इतर समाजावर अत्याचार केला. आज त्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांना त्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे, ही सकारात्मक बाब आहे. मात्र फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही तर तसे आचरणही करावे लागेल, असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फेचा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे, तो राज्य शासनाचा निर्णय आहे तो त्यांनी घेतला आहे, यावर आम्ही काहीही बोलणार नाही, असंही पवार म्हणाले. (शिवसेनेसाठी आज सर्वात मोठा दिवस, धनुष्यबाणाचा निकाल लागणार) नाशिक येथे झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. सरकारच्या वतीने चौकशी केली जाईल, चौकशीनंतर कारण समोर येतील, जे जखमी आहेत. त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल. या साठी राज्य सरकारची यंत्रणा कार्य करत आहे. घडलेले अपघात दुःखद बाब आहे. जे गेले आहे, त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आपण सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत, अशी भावना पवारांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या