'राहुल गांधीच्या वक्तव्याने खरंतर देशाची मान खाली गेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी ज्याप्रमाणे आक्षेपार्ह विधान करत आहे आणि त्याचा समर्थन काँग्रेस करत आहे'
नागपूर, 17 नोव्हेंबर : ‘विदर्भात येऊन वीर सावरकरांबद्दल बोलणे भाजप खपवून घेणार नाही. त्यांना महाराष्ट्रात येण्याचा अधिकार राहिला नाही. राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आम्ही मागणी केली’ असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली आहे, हिंमत असेल तर माझी यात्रा अडवून दाखवा, असं विधान करत राहुल गांधी यांनी भाजपला आव्हान दिलं. त्यांच्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिलं. ‘राहुल गांधीच्या वक्तव्याने खरंतर देशाची मान खाली गेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी ज्याप्रमाणे आक्षेपार्ह विधान करत आहे आणि त्याचा समर्थन काँग्रेस करत आहे. खरंतर हे यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास माहीत असूनही जाणीवपूर्वक आकसाने हा इतिहास दडपून टाकायचा आहे. यामुळे देशामध्ये काँग्रेस विषयी घृणा निर्माण झाली आहे. जनता त्यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेमध्ये एक दोन टक्के कमवले होतं ते त्यांनी सगळं गमावलं आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. (सावरकर वादात मनसेची उडी, राज ठाकरेंचे थेट कार्यकर्त्यांना आदेश) राजीव गांधींची पुण्यतिथी असते तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना श्रद्धांजली देतात. पण मला कुठे दिसलं नाही राहुल गांधी यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले का? त्यांच्याबद्दल काही चार शब्द ते बोलले का? याचा विचार करावा. मुळात उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष पूर्णपणे काँग्रेसच्या वेठीला बांधला आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. काँग्रेस पक्षाला ते समर्पित झालेले आहे आमची अपेक्षा होती उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेचा बहिष्कार करायला पाहिजे होता. मात्र ते आदित्य ठाकरे ला पाठवतात. उद्धव ठाकरे हे ज्याप्रमाणे काँग्रेस बोलते त्याचप्रमाणे बोलतील, वीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस सारखाच बोलत आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. (हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटीवारीवर राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… ) देवेंद्रजी असे कधीही बोलले नाही एखाद्याच्या विरोधात जर आवाज उचलला. अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा दोषी आहे. उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून चुक केली आहे. देवेंद्रजींनी शिवशाहीचे राज्य महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला आणि आता मोगलाई सरकार बदलून खरंच शिवशाही सरकार आणलं आहे. फडणवीस आणि शिंदे यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे, असंही बावनकुळे म्हणाले.