JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राहुल गांधींची ईडी चौकशी सुरूच, ED विरोधात आंदोलन करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलं आक्षेपार्ह विधान

राहुल गांधींची ईडी चौकशी सुरूच, ED विरोधात आंदोलन करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलं आक्षेपार्ह विधान

Nagpur: ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येत असताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे.

जाहिरात

ED विरोधात आंदोलन करताना नागपुरातील काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, मोदींबाबत केलं अपमानास्पद वक्तव्य

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 15 जून : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीकडून गांधी कुटुंबीयांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. सोमवारपासून राहुल गांधींची (Rahul Gandhi) ईडी चौकशी करत आहेत. राहुल गांधींच्या चौकशीचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान सोमवारी ईडीच्या कारवाईविरोधात संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अशाच प्रकारे नागपूर (Nagpur) येथीही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या काँग्रेस नेत्याची जीभ घसरली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. नागपुरात ईडीच्या विरोधात आंदोलन करताना नागपूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसैन (Congress leader Sheikh Hussain) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधान केलं. शेख हुसैन यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ सुद्धा समोर आला असून तो व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने शेख हुसैन यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जर पोलिसांनी शेख हुसैन यांच्याविरोधात कारवाई करत अटक केली नाही तर भाजप सुद्धा आंदोलन करेल असा इशाराच भाजप नेत्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे अमरावतीमधील बडनेरा पोलीस स्टेशनमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेख हुसैन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. वाचा : ‘मुख्यमंत्री कार चालवतात अन् सरकार देवाच्या भरवश्यावर चाललंय’ जलआक्रोश मोर्चात फडणवीसांचा हल्लाबोल शेख हुसैन यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर करताना दिसून येत आहेत. मोदींवर टीका केल्यावर शेख हुसैन याांनी पुढे म्हटलं, कदाचित मला यासाठी ईडीकडून 1000 नोटीसा मिळतील. पण मला पर्वा नाही. आम्ही लढत आलो आणि लढत राहू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या