JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / यवतमाळ : जिवती लावण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश, नंतर अल्पवयीन गतीमंद मुलीवर नराधमाकडून अत्याचार

यवतमाळ : जिवती लावण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश, नंतर अल्पवयीन गतीमंद मुलीवर नराधमाकडून अत्याचार

आरोपी सुरेश याने पोळा सणाच्या निमित्ताने जिवती लावण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. यावेळी पीडित गतिमंद युवती ही घरात एकटी होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 24 जुलै : राज्यात अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका गतीमंद मुलीवर 47 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - एका गतीमंद अल्पववयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 17 वर्षीय पीडित युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शनिवारी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्यावरून नराधमाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पोचीराम गडेवार, असे या नराधमाचे नाव आहे. तसेच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा दामले फैलातील रहिवासी आहे. घटनेनंतर काढला पळ - आरोपी सुरेश याने पोळा सणाच्या निमित्ताने जिवती लावण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. यावेळी पीडित गतिमंद युवती ही घरात एकटी होती. याचाच फायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि यानंतर येथून पळ काढला. ही घटना 22 जुलैला घडली. पीडितेचे आईवडील घरी आल्यावर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी थेट वणी पोलीस ठाणे गाठले आणि अत्याचाराची तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी आरोपी नराधम सुरेशविरोधात भादंवि कलम ३७६, बाल लैंगीक शोषण अधिनियम पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक केली आहे. हेही वाचा -  चंद्रपूर : मुलाच्या गुन्ह्याची बापाला मिळाली शिक्षा; तो मात्र अनभिज्ञ, नाल्याजवळ आढळला मृतदेह   याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे हा तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर आरोपीविरोधात एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या