JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur : संक्रांतीच्या निमित्तानं 4000 शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतील ‘ही’ शपथ, Video

Nagpur : संक्रांतीच्या निमित्तानं 4000 शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतील ‘ही’ शपथ, Video

मकर संक्रांतीमुळे बाजारात पतंग-मांजा खरेदी करणाऱ्यांची रेलचेल वाढली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 12 जानेवारी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांती मुळे बाजारात पतंग-मांजा खरेदी करणाऱ्यांची रेलचेल वाढली आहे. कोंबडी सारखा गळा कापला जावा असे तीक्ष्ण स्वरूप मांजाला प्राप्त असते. त्यामुळे मांजा खरेदी विक्रीवर बंदी आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सुमारे 4 हजार 100 शाळांमध्ये नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.   नायलॉन मांजा अनेकांच्या गंभीर दुखापती व मृत्यूचे कारण बनतो. प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्री व वापराविरुद्ध जिल्हा प्रशासनाने देखील कंबर कसली आहे.अनेक ठिकाणी छापा टाकून धरपकड सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सुमारे 4 हजार 100 शाळांमध्ये नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे नागरिकांसह पशुपक्षी यांच्या जीविताला, आरोग्याला आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर न करता हा सण विद्यार्थ्यांनी साजरा करावा यासाठी शाळेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल  जनहित याचिकेतील तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाद्वारे पर्यावरण (संरक्षण) कायदा,1986  च्या कलम पाच अन्वये पतंग उडविण्यासाठी मकरसंक्रांत सणाला कृत्रिमरीत्या व प्लास्टिकपासून तयार केलेला नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यात महापालिका क्षेत्रात झोननिहाय तसेच नगरपालिका क्षेत्र व ग्रामीण भागात देखील टास्क फोर्स समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांनी संबंधित पोलीस ठाणेदार यांच्या समवेत नायलॉन मांजा विक्री होत असल्यास तसेच नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या विरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.   ऑनलाईन विक्रीवर कारवाई मांजाच्या वापरामुळे पक्षी व मानवी जीवितांना तीव्र इजा होण्याचा धोका असतो. प्रसंगी यात जीव जाण्याची देखील शक्यता आहे. न तुटणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असताना शहराच्या विविध ठिकाणी लपून छपून अव्वाच्या-सव्वा दरात विक्री सुरू आहे. परराज्यातून येणाऱ्या नायलॉन मांजावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन देखील चेक पोस्टवर ऍक्टिव्ह असून सायबर सेलने ही ऑनलाईन मांजाच्या विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. 50 जणांचा बळी कोंबडी सारखा गळा कापला जावा असे तीक्ष्ण स्वरूप या मांजाला प्राप्त असते. या मांजाने गेल्या दहा वर्षात एकट्या उपराजधानी पन्नासपेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे, तर शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले आहे. सदर बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील तब्बल 4 हजार 100 शाळांमधील विद्यार्थ्यांना मकर संक्रांत होईपर्यंत दररोज शपथ देण्यात येत आहे. पारंपरिक कुंभार उद्योग होणार हायटेक, इलेक्ट्रिक चाकावर द्या भांड्यांना आकार विद्यार्थ्यांनी घेतली शपथ ‘मी पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरणार नाही आणि इतर कोणालाही नायलॉन माझ्या वापरू देणार नाही’ या आशयाची प्रतिज्ञा सर्व शासकीय व खाजगी शाळा तसेच महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी देण्यात येत आहे. यासोबत पालकांना देखील समज देण्यात येत आहे. आपला पाल्य पतंग उडविताना कोणता मांजा वापरत आहे याकडे लक्ष ठेवण्याचे व नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते अशी समज विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील या उपक्रमातुन देण्यात येत आहे. अशी माहिती नागपूर महानगर पालिका इंग्लिश हायस्कूल चे श्याम गोहोकर यांनी दिली.   येथे करता येईल तक्रार नायलॉन मांजा बाबत तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे नागरिकांना 0712 -2562668 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 यावर तसेच जवळच्या महापाल महानगरपालिका झोन कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिष, नगरपंचायत पंचायत समिती कार्यालय येथे देखील नायलॉन मांजा बाबत तक्रार दाखल करता येईल.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या