नागपूर, 13 जानेवारी : मकर संक्रांती निमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात आकर्षक पतंग दाखल झाले असून खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. यंदा बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांची विक्रीही जोरात आहे. दरवर्षी नागपुरात संक्रांतीनिमित्त पतंगाची मोठी उलाढाल होत असते. बाजारातील पतंग खरेदीसाठी तरुण, बालकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या देशात प्रत्येक सण साजरा होत असताना सर्वत्र अतिशय आनंद आणि उत्साह बघायला मिळतो. नववर्षाच्या सुरुवातीला साजरा होणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त हाच उत्साह सर्वत्र बघायला मिळत आहे. सध्या बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक रंगीबेरंगी पतंग दाखल झाले आहेत. प्लास्टिक बंदीमुळे बाजारात कागदी पतंगाला चांगली मागणी आहे. कागदी पतंग तयार करणारे अनेक कुटुंब नागपूरतील नवीन बाबुळखेडा परिसरात स्थित आहे. येथील पतंग कारागिरांनी मागील अनेक दशकांपासून पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या पतंग व्यवसायाला जिवंत ठेवले आहे. पतंग हीच अनेकांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे. वाढत्या शहरीकरण, कामांची व्यस्तता आणि मनोरंजनाचे अनेक संसाधने उपलब्ध असल्याने हल्ली पतंग उडवण्याला दिवसापुरतेच महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, असं असताना देखील पतंग ही पारंपारिक कला नागपुरातील काही कुटुंबांनी जिवंत ठेवली आहे.
पतंग व्यवसायासाठी नवीन बाबुळखेडा शहरांमध्ये प्रख्यात असून पूर्वी या एरियामध्ये 30 ते 35 कुटुंब घरांमध्ये पतंग तयार करत होते. कालांतराने त्यात घट झाली. आज घडीला 15 ते 20 कुटुंब आजही हा व्यवसाय करत आहेत. फार पूर्वी येथे बिडी बनविण्याचा व्यवसाय लोक करत होते, मात्र कालांतराने त्यावर बंदी आल्याने हा व्यवसाय बंद पडला. नंतर अनेकांनी उपजीविकेसाठी पतंग व्यवसायाला प्राधान्य दिले. 50-60 वर्षांपासून अविरतपणे आजही येथे पतंग तयार होत आहेत. संक्रांतीच्या निमित्तानं 4000 शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतील ‘ही’ शपथ, Video किमती वाढल्या यंदा पतंगाच्या किमतीत देखील जवळजवळ 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पतंग तयार करताना ती पूर्णतः हाताने बनवली जाते. कुठल्याही मशीनचा यात वापर होत नाही. साधारणतः एक पतंग तयार करण्यासाठी 10 स्टेप मध्ये तयार होते. त्यामुळे त्याला लागणारा कालावधी आणि मेहनत भरपूर आहे. हल्ली नायलॉन मांजामुळे पतंग व्यवसायाला झळ पोहचत आहे. 50 डिझाईन इथे तयार होणारे पतंग शहरात होलसेल मध्ये विकले जातात. त्यात प्रामुख्याने 50 हून अधिक डिझाईन आणि प्रकार आहेत. त्यात प्रामुख्याने लंगोट, लंगोट मूछ्याक, अंकेदर, डब्बेदार, रॉकेटदार,चील, गोलेदर असे अनेक प्रकार असल्याचे व्यावसायिक गुलाब श्रीरामे यांनी सांगितले.