JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ओळख, मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन् गर्भवती झाल्यावर मात्र..., अमरावतीच्या तरुणीसोबत काय घडलं?

ओळख, मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन् गर्भवती झाल्यावर मात्र..., अमरावतीच्या तरुणीसोबत काय घडलं?

ओळख, मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन् गर्भवती झाल्यावर मात्र तरुणीला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 21 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता लिव्ह इनसंदर्भातही अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अमरावती जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह पार्टनरने शारिरक संबंध प्रस्थापित केले. यानंतर तरुणी गर्भवती राहिल्यावर तिला गर्भपात कर अन्यथा तुला मारुन टाकेन, अशी धमकी दिल्याने तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. काय आहे संपूर्ण प्रकरण - याप्रकरणी लिव्ह इन पार्टनरने राजापेठ पोलिसात 19 तारखेला तक्रार दिली. यानंतर आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही प्रेमी युगूल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तसेच यातील तरुणाने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दिले होते. तसेच तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवले. यातून ती तरुणी गर्भवती राहिली. पीडित तरुणी ही गर्भवती राहिल्यावर या तरुणाने तिला गर्भपात कर अन्यथा जीवे मारेन, अशी धमकी दिली. अविनाश लक्ष्मण मगीरवार (37, रा. कुंटुर, नांदेड), असे या तरुणाचे नाव आहे. अविनाश आणि पीडित तरुणीची जानेवारी 2019 मध्ये अमरावती येथील 32 वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली होती. या दोघांच्या ओळखीचे रुपांतर हे मैत्रित झाले. यानंतर अविनाश आणि पीडित तरुणी हे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले. हेही वाचा -  लिव्हइनने घेतला आणखी एकीचा जीव, पतीशी दुरावा अन् घडलं भयाण कांड! यानंतर अविनाशने या तरुणीला लग्नाचे आमिषही दिले होते. तसेच अनेक वेळा दोघांनी शारिरिक संबंध ठेवले. त्यातून ती तरुणी गर्भवती झाल्यावर त्याने तिला गर्भपात करण्याचे सांगत नाही केला तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकी दिली. यानंतर तरुणीने अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या