नागपूर, 15 डिसेंबर : हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अलीकडेच उद्घाटन संपन्न होते. यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने साई भक्तांसाठी एक आनंददायी घोषणा केली आहे. दररोज नागपूर एसटी आगारातून नागपूर ते शिर्डी अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावरून शिर्डीला साईभक्त अवघ्या आठ तासात पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचीही मोठी बचत होऊन हा आनंददायी प्रवास साईभक्तांना अनुभवता येणार आहे. दररोज रात्री 9 वाजता बस शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी दररोज नागपूर येथील गणेशपेठ आगारातून बस जाणार आहे. नागपुरातील साई बाबांच्या भक्तांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. यात वेळेची मोठी बचत होणार असून यात योग्य नियोजन केलं तर अल्पावधीत दर्शन घेऊन माघारी परत येता येणार आहे. 15 डिसेंबर पासून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. दररोज रात्री 9 वाजता गणेशपेठ बसस्थानकावरून ही विशेष बस सोडण्यात येणार असून पहाटे 5.30 पर्यंत ती शिर्डीला पोहचेल. त्याचप्रमाणे शिर्डी येथून रात्री 9 वाजता सुटून नागपूरला 5.30 पर्यंत परत येणार आहे. बैलगाडीनंतर समृद्धी महामार्गावर धावले हरीण, Video Viral 15 स्लीपर बर्थ येत्या 15 डिसेंबरपासून दररोज रात्री 9 वाजता नागपूर ते शिर्डी अशी विना वातानुकूलित सेमी सिटर कम स्लीपर अश्या स्वरूपाची बस सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेचे वैशिष्ट्य असे की खाली 30 प्रवासी बसू शकणार असून 15 स्लीपर बर्थ असणार आहे.साधारण 8 ते 8.30 तासाच्या अवधीत नागपूर ते शिर्डी असा प्रवास साईभक्तांना करता येणार आहे. लाईट, पाणी, रस्ता नाही!, देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर विकासापासून दूर शनी शिंगणापूरचेही होईल दर्शन प्रवाशी भाडे देखील माफक प्रमाणात ठेवण्यात आले आहे. या प्रवासासाठी 1300 रुपये आकारले जाणार आहे. 9 वाजता ही बस शिर्डीसाठी रवाना होणार असून शिर्डी येथे ती 5.30 दरम्यान पोहचेल. प्रवाशांनी दर्शन केल्यावर ती तेथून शनी शिंगणापूरला वळवण्यात येईल आणि रात्री परत शिर्डी वरून नागपूरसाठी रवाना होणार आहे. यामुळे नागपूर-शिर्डी -शनिशिंगापूर असा प्रवास भाविकांना करता येणार आहे. प्रवासादरम्यान बस फक्त कारंजा लाड येथे थांबणार असून उर्वरित प्रवासात ही बस बिना थांबा स्वरूपाची असणार आहे. त्यामुळे सर्व प्रवासी, साई भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ नागपूरचे विभागीय नियंत्रण श्रीकांत गभने यांनी केले. अमृत ज्येष्ठ योजनाचा मिळणार लाभ अमृत ज्येष्ठ योजने अंतर्गत 100% सवलत यामध्ये पुरवणीत येणार आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांना 50 % सवलत देण्यात येणार आहे. भविष्यात या बस सेवेला मिळणारा प्रतिसाद बघून अजून काही बस सेवा सुरू करण्यात येतील. तसेच औरंगाबाद, पुण्याकडे जाणाऱ्या बसेस जालन्यापर्यंत समृद्धी महामार्गावरून बस सेवा सुरू करण्याच्या विचाराधीन आहोत. आगामी काळात मुंबई पर्यंत काम पूर्ण झाल्यास मुंबई पर्यंत समृद्धी महामार्गावरून बस सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती एसटी महामंडळ नागपूरचे विभागीय नियंत्रण श्रीकांत गभने यांनी दिली.