JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वर्धा : गर्लफ्रेंड तिच्या मित्रासोबत नाचली, प्रियकराने रागाच्या भरात तरुणाला चाकूने केले जखमी

वर्धा : गर्लफ्रेंड तिच्या मित्रासोबत नाचली, प्रियकराने रागाच्या भरात तरुणाला चाकूने केले जखमी

रुपम नामक युवक, असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 7 डिसेंबर : प्रेमाच्या त्रिकोणातून हत्येच्या अनेक घटना समोर येत आहेत. प्रेमाच्या त्रिकोणातून एका युवकावर त्याच्या मित्राने साथीदारांच्या मदतीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. नागपूरमधील ही घटना ताजी असतानाच आता वर्धा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘गर्लफ्रेंड’सोबत ‘डान्स’ केल्याने प्रियकराचा राग झाला अनावर झाल्याने त्याने रागाच्या भरात प्रेयसीच्या मित्राला जोरदार मारहाण केली. तसेच चाकूने हल्ला करत जखमी केले. काय आहे संपूर्ण प्रकरण - रुपम नामक युवक, असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना उमरी मेघे गावात घडली. प्रेयसीसोबत डान्स केल्याच्या रागातून प्रियकराने संतापाच्या भरात प्रेयसीच्या मित्रावर चाकून हल्ला करत त्याला जखमी केले. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आरोपीना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रुपम नामक युवक हा उमरी गावात असताना आरोपी आकाश भोयर (रा. मास्टर कॉलनी) आणि चिंदू नावाचा तरुण हे दोघेही त्याच्याजवळ आले. यावेळी माझ्या ‘गर्लफ्रेंड’सोबत पार्टीत डान्स का केला, असे आकाश रुपमला म्हणाला आणि शाब्दिक वाद करु लागला. हेही वाचा -  एकाच मुलीची दोघांशी ओळख, प्रेमाचा त्रिकोण अनं नागपुरात तरुणावर जीवघेणा हल्ला

यावेळी रुपमने हटकले असता आकाश आणि चिंदू या दोघांनी आकाशच्या पाठीवर दगडाने मारहाण केली. तसेच चाकूने उजव्या हाताच्या बोटावर मारून त्याला जखमी केले. याप्रकरणी रुपमने सावंगी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या