JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमरावती : जावयाने केली मोठी फसवणूक, रिटायरमेंटचे 7 लाख अन् लाखोंचे दागिने लुटले

अमरावती : जावयाने केली मोठी फसवणूक, रिटायरमेंटचे 7 लाख अन् लाखोंचे दागिने लुटले

पतीच्या या छळाला कंटाळून अखेर त्या विवाहितेने 15 सप्टेंबरला अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 17 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यात जावयाने आपल्या सासरच्या मंडळींना लाखो रुपयांत फसवणूक केली आहे. सासूकडून रिटायरमेंटचे सात लाख रुपये आणि चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिन्यात लुबाडले. तसेच यानंतर पत्नीला मारहाण करत पत्नीला घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पतीच्या या छळाला कंटाळून अखेर त्या विवाहितेने 15 सप्टेंबरला अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. या तक्रारीनंतर महिलेचा पती अनंत भारदे, मदन हाडोळे, प्रवीण शिनकर, अतुल भारदे आणि चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचे अनंत भारदेसोबत आर्य समाज मंदिरात लग्न झाले होते. त्या लग्नाला भारदे कुटुंबीयांचा विरोध होता. मात्र, यानंतर कुटुंबीयांचा विरोध मावळला. यानंतर स्वागत समारंभ होऊन संसाराला सुरुवात झाली. काही दिवसांनंतर अनंतने तिला क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. लग्नाच्या वेळी ती फक्त 20 वर्षांची होती. त्यामुळे तिने सासरीदेखील शिक्षण सुरू ठेवले. मात्र, इकडे सासरी तिला तिचा पती अनंत आणि एक महिला तिला टोमणे मारायची. दरम्यान, तिला दोन्ही मुलीच झाल्यावर पतीव्यतिरिक्त अन्य काही आरोपींनीही तिला टोमणे मारले आणि मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला. आरोपी अनंत हा नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तर इतर उर्वरित सातही आरोपींनी तिला वारंवार फोन करून धमकाविले. आरोपी अनंत याने स्वत:च्या मोठ्या मुलीला मारहाण केली, तर लहान मुलीला स्वत:च्याच आईविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न केला. यासोबतच लहान मुलीला अतुल भारदे आणि एका महिलेने मारहाण केली. दारूच्या नशेत त्याने अनेकदा शिवीगाळ केली, असेही पीडितेने म्हटले आहे. हेही वाचा -  नागपूर : पत्नीसोबत सतत व्हायचा वाद; कंटाळलेल्या पतीने मध्यरात्रीच भांडणाचा केला भयानक शेवट पतीकडून होणारा छळ महिलेला असह्य झाला होता. त्यामुळे तिने आपल्या आईला याबाबत सांगितले. यानंतर मुलीला त्रास नको म्हणून तिच्या आईने स्वत:च्या रिटारयमेंटमधून आलेले सात लाख रुपये आरोपी अनंतला दिले. पीडितेनेदेखील पती अनंतला सुमारे चार लाख रुपयांचे दागिने दिले. त्याने प्लॉट दोघांच्या नावाने खरेदी केल्याची बतावणी केली. मात्र, प्रत्यक्षात तो त्याच्या नावे झाला. त्यानंतरही त्याने पीडितेला त्रास दिला. अखेर तिने महिला सेलमध्ये धाव घेतली. मात्र, तेथे तडजोड न झाल्याने गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या