JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तेव्हा तुमचा आशिर्वाद होता, पुढेही..', मुख्यमंत्री शिंदेंची मोदींना खास विनंती

'तेव्हा तुमचा आशिर्वाद होता, पुढेही..', मुख्यमंत्री शिंदेंची मोदींना खास विनंती

तुम्ही रेल्वे, रस्त्यांसाठी लाखो, कोट्यवधी रुपये देण्याची तरतूद केली आहे. आगामी काळात आम्हाला मदत हवी आहे.

जाहिरात

तुम्ही रेल्वे, रस्त्यांसाठी लाखो, कोट्यवधी रुपये देण्याची तरतूद केली आहे. आगामी काळात आम्हाला मदत हवी आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 11 डिसेंबर : ‘तुम्ही भारतीय अर्थव्यवस्था उंचावर नेली आहे. पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताचं नाव मोठं केलं आहे. महाराष्ट्रावर तुमचा आशिर्वाद कायम असू द्या, महाराष्ट्रात सगळ्या लोकांना मदत करायची आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीतून भाषण केलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. माझ्यासाठी हा क्षण स्वप्नपूर्ती, अभिमान आणि गर्वाचा आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजर आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी विश्वास दाखवला आणि आज महामार्ग उभारला आहे. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं त्याबद्दल समाधानी आहे, असंही शिंदे म्हणाले. देवेंद्र म्हणाले डबल इंजिन सरकार आहे, आम्ही सरकार स्थापन केले, ते सर्व सामान्य लोकांचे सरकार तयार केले आहे. सर्व लोकांना हे आपले सरकार वाटत आहे, ही आपले पणाची भावना निर्माण झाली आहे. तुमचे सुद्धा आम्हाला आशिर्वाद आहे. पहिल्याच दिवशी तुम्ही सांगितलं, शिंदे-फडणवीस तुम्ही लोकांची काम करा, केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे असं सांगितलं होतं, येणाऱ्या काळातही तुमच्याचे सहकार्य असेच असावे, असंही शिंदे म्हणाले. तुम्ही रेल्वे, रस्त्यांसाठी लाखो, कोट्यवधी रुपये देण्याची तरतूद केली आहे. आगामी काळात आम्हाला मदत हवी आहे. आमच्या महाराष्ट्रात उद्योग यावे, मोठाले प्रकल्प यावे, लोकांना रोजगार मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंतीही शिंदेंनी केली. देशामध्ये जी 20 चे आयोजन केले जाणार आहे, हे सौभाग्यचं आहे. हे केवळ तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तुम्ही भारतीय अर्थव्यवस्था उंचावर नेली आहे. पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताचं नाव मोठं केलं आहे. महाराष्ट्रावर तुमचा आशिर्वाद कायम असू द्या, महाराष्ट्रात सगळ्या लोकांना मदत करायची आहे, असंही शिंदे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या