JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Love Marriage नंतर पत्नीवर संशय, रागाच्या भरात दोन दिवसांच्या बाळासोबतही भयानक कृत्य

Love Marriage नंतर पत्नीवर संशय, रागाच्या भरात दोन दिवसांच्या बाळासोबतही भयानक कृत्य

प्रतीक्षा गिरीश गोडाणे (वय 25) हिचा अमरावती जिल्ह्यातील सावरडी येथील गिरीश गोडाणे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 2 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. नागपूरमध्येही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रूर काळजाच्या बापाने दोन दिवसांच्या बाळाला हुसकावून फरशीवर आपटले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन निर्दयी बापाने हे संतापजनक कृत्य केले. काय आहे संपूर्ण प्रकरण - नागपूरच्या मेडिकल या शासकीय रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 46 मध्ये ही संतापजनक घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन निर्दयी बापाचा चिमुकल्याला फरशीवर फेकले. गिरीष गोंडाने, असं निर्दयी बापाचे नाव आहे. या प्रकरणी बाळाच्या वडिलांना अजनी पोलिसांनी अटक केली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी घडलेली ही घटना 1 जानेवारी 2023रोजी उघडकीस आली. जीवनकला नरेश मेश्राम (वय 50) यांनी दिलेल्या तक्रारी वरून अजनी पोलिसांनी भादंवि कलम 307, 323 अन्वये गुन्हा दाखल करीत गिरीश गोडाणे याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा गिरीश गोडाणे (वय 25) हिचा अमरावती जिल्ह्यातील सावरडी येथील गिरीश गोडाणे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. तो नेहमी प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याचदरम्यान, प्रतिक्षा ही मेडिकलच्या वॉर्ड क्र. 46 मध्ये प्रसुतीसाठी दाखल होती. दोन दिवसांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला. घटनेच्या दिवशी गिरीश वॉर्ड क्र. 46 मध्ये आला. हेही वाचा -  नवरा-बायको फुल टाईट, दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर पतीने उचललं भयानक पाऊल त्याने प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत तिला हातबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या शेजारी निजलेल्या दोन दिवसाच्या तान्हुल्या बाळाला उचलून त्याला फरशीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या