JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गोवा जिंकल्यानंतर फडणवीसांचं नागपुरात जंगी स्वागत, होमग्राऊंडवर येताच महाराष्ट्रातील राजकारणाबाबत वर्तवलं मोठं भाकित

गोवा जिंकल्यानंतर फडणवीसांचं नागपुरात जंगी स्वागत, होमग्राऊंडवर येताच महाराष्ट्रातील राजकारणाबाबत वर्तवलं मोठं भाकित

Devendra Fadnavis: नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं आज नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं.

जाहिरात

गोवा जिंकल्यानंतर फडणवीस नागपुरात, होमग्राऊंडवर येताच महाराष्ट्रातील राजकारणाबाबत वर्तवलं मोठं भाकित

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 17 मार्च : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (5 state assembly election) नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत चार राज्यांत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. गोव्यातही भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे होते. गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांचे या विजयानंतर मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले आणि तेथेही त्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत (Devendra Fadnavis grand welcome by BJP workers in Nagpur) करण्यात आले. तसेच विमानतळापासून एक रॅलीही काढण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत एक भाकित वर्तवलं आहे. (Devendra Fadnavis prediction about Maharashtra politics) काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं, हा सत्कार मी स्वीकारतोय. मोदीजींच्या वतीने आणि टीम गोव्याच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात स्वीकारतोय. खरं श्रेय त्यांचं आहे. जी काही संधी मिळाली त्याचं सोन करण्याचा प्रयत्न केला. मोदीजींच्या बाबत जे काही सकारात्मकता, विश्वास आहे त्याचा हा विजय आहे. आपल्या लोकांनी दिलेलं प्रेम आहे आणि त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, शक्तीप्रदर्शनापेक्षा हा एक आनंदोत्सव आहे. इतका चांगला विजय मिळवल्यानंतर हा आनंदोत्सव साजरा होणारच आहे. शक्ती आमची वाढलेलीच आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकीत ती दिसली आहे. येत्या काळात राज्यातील महानगरपालिका असो, जिल्हा परिषद निवडणुका असोत प्रत्येक निवडणुकीत आपल्याला पहायला मिळेल. वाचा :  मोठी बातमी ! ठाकरे सरकारचा ‘तो’ निर्णय राज्यपालांकडून रद्द महाराष्ट्रात भाजप एकटाच सत्तेवर येईल, 100 टक्के तसं होईल. आज माझं भाकीत लिहून घ्या, 2024 साली भाजप स्वत:च्या ताकदीने महाराष्ट्रात सत्तेवर दिसून येईल. 2024 मध्ये पूर्ण बहुमताचं भाजप सरकार महाराष्ट्रात पहायला मिळेल. असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गोवा, उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये मिळालेला विजय हा एकप्रकारे मोदीजींच्या कामाची दिलेली पावतीच आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती तिच आहे. 2024 साली महाराष्ट्रात पुर्ण बहुमताचं सरकार भाजप तयार करेल. 2024 पूर्वी काही राजकीय परिस्थिती पहायला मिळेल का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी असं म्हटलं की, तुम्ही लगेच सरकार पाडणार, पडणार अशा चर्चा सुरू करता आणि त्यात मला इच्छा नाहीये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या