JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...तेव्हा पटोले अजित पवारांसमोर नाक रगडत होते; बावनकुळेंनी पुन्हा 'मविआ'ला डिवचलं

...तेव्हा पटोले अजित पवारांसमोर नाक रगडत होते; बावनकुळेंनी पुन्हा 'मविआ'ला डिवचलं

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 30 डिसेंबर :  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाने टाईमपास करून सभागृहाचा वेळ वाया घालवल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. तसंच महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नाही, उध्दव ठाकरे काँग्रेसच्या कार्यालयात बसतात याच दुःख राष्ट्रवादीला असल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं.  त्यांनी यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. नेमकं काय म्हटलं बावनकुळे यांनी?    चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाने टाईमपास करून सभागृहाचा वेळ वाया घालवला. नाना पटोले यांनी अडीच वर्ष धानाला बोनस देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे नाक रगडलं, मात्र युतीचं सरकार आल्यानंतर तातडीने 15 कोटींच्या बोनसची घोषणा करण्यात आली. कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बोलताना कर्नाटकची एक इंच जमीन महाराष्ट्राला देणार नाही असं म्हणतात, यावर काँग्रेसची काय भूमिका आहे, काँग्रेस याचा विरोध करेल का? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा :  शिवसेना भवन, सामना वर शिंदे गटाला ताबा मिळवता येईल? वाचा Inside Story शरद पवारांवर निशाणा  दरम्यान यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. माराठा समाजाचं आरक्षण शरद पवार यांच्यामुळे गेल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. पवार आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं सांगतात, पवारांच्या पोटातलं आता ओठावर आलं आहे. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी देखील हेच लोक असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या