JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur : थायलंडमधून आली दीक्षाभूमीसाठी सुंदर बुद्ध मूर्ती, पाहा Video

Nagpur : थायलंडमधून आली दीक्षाभूमीसाठी सुंदर बुद्ध मूर्ती, पाहा Video

बौद्ध मूर्ती आणि अस्थिधातू नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी आणि काटोल रोडवरील बुद्धवनला दान स्वरूपात देण्यात आल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 02 डिसेंबर : मानवतेला प्रेम शांती आणि करुणेचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या अनेक भावमुद्रेतील प्रतिमा नेहमीच आकर्षणाच्या केंद्रबिंदू राहिल्या आहेत. या मूर्तीमधून सकारात्मकतेची वेगळीच ऊर्जा प्राप्त होत असते. अशाच नेत्रदीपक बुद्ध प्रतिमा थायलंड भिक्खू संघाचे सर्वोच्च बौद्ध धम्म गुरु आणि उपासकांतर्फे दोन बौद्ध प्रतिमा आणि अस्थिधातू नागपूर च्या पवित्र दीक्षाभूमी आणि काटोल रोडवरील बुद्धवनला दान स्वरूपात देण्यात आल्या आहेत.  नागपूरच्या ऐतिहासिक आणि पवित्र अशा दीक्षाभूमीला आणि काटोल रोडवर असलेल्या बुद्धवन येथे थायलंड येथील भिक्खू संघ, उपासक उपासिका वर्ग यांच्यामार्फत दोन भव्य बौद्ध प्रतिमा आणि अस्थीधातू, हिरे माणिक मोती, सोनं दान स्वरूपात देण्यात आले आहे. या मागील मुख्य उद्देश म्हणजे भारतातील नागपूरच्या दीक्षाभूमीवरून बुद्ध शासनाचा प्रचार आणि प्रसार झाला त्या बौद्ध क्रांतीभूमी आणि थायलंड यांच्यातील मैत्री संबंध टिकून राहावे, या दोन देशातील समन्वय रहावा हा या मागील उद्देश आहे, अशी माहिती बुद्धवन येथील आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रमुख निर्वाण महानग यांनी दिली. Video : लता दीदींचा वर्ध्यात आहे जबरा फॅन, घरात उभारलंय मंदिर  400 किलो वजनाची मूर्ती या बुद्ध प्रतिमांची उंची नऊ फूट असून तिचे वजन 400 किलो एवढे आहे. थायलंड वरून आणलेल्या या बुद्ध मूर्तीची मिरवणूक नागपुरातील पंचशील नगर, कमाल चौक, इंदोरा बेदनबाग कडवी चौक, संविधान चौक, सीताबर्डी मार्गे काढून दीक्षाभूमी येथे मोठ्या उत्साहात आणण्यात आली. ही मूर्ती पवित्र दीक्षाभूमी येथे कायमस्वरूपी असणार आहे.   पंचशील ध्वज घेऊन मिरवणूक  मिरवणुकीत थायलंडचे भिक्खु संघ उपासक, उपासिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो अनुयायी पांढरे वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज घेऊन सहभागी होते, अशी माहिती बाबासाहेब आंबेडकर नवनिर्माण समिती पंचशील नगरचे अध्यक्ष इंद्रपाल वाघमारे, आणि युवा भीम मैत्री संघचे अध्यक्ष दीपक वसे यांनी दिली. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या