JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चिंताजनक! नागपूरची हवा बनली घातक, ‘ही’ आहेत कारणं Video

चिंताजनक! नागपूरची हवा बनली घातक, ‘ही’ आहेत कारणं Video

नागपूर शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. जानेवारी महिन्याचे सर्व दिवस नागपूरची हवा प्रदूषित होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 04 फेब्रुवारी : एकेकाळी ग्रीन सिटी म्हणून ओळख असलेले नागपूर     शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. वातावरणात सल्फर डायऑक्साईड (SO2) व  नायट्रोजन डायॉक्साईड (NO2) चा स्तर प्रचंड वाढला आहे. जानेवारी 2023 मधील 31 पैकी 31 दिवस हवा प्रदूषित असल्याचे दिसून आले आहे.   कोपर्निकस एटमॉसपियर मॉनिटरिंग सर्विस उपग्रहाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचे चित्र जारी केले आहे. सर्वेक्षणातील चित्रातून विदर्भातील नागपूर, चंद्रपूरसह गोंदिया व अमरावतीच्या वातावरणात सल्फर डायऑक्साईड (SO2) व  नायट्रोजन डायॉक्साईड (NO2) चा स्तर प्रचंड वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जानेवारी महिन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. 2023 च्या जानेवारी महिन्याचे सर्व दिवस नागपूरची हवा प्रदूषित होती. यातले केवळ दोन दिवस शुद्ध हवेचा स्तर समाधानकारक होता. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.

डिसेंबरचे 31 पैकी 30 दिवस हवा खराव सर्वसाधारणपणे हिवाळ्यातील थंडीचा काळ आरोग्यदायी म्हणून गणला जातो. मात्र नागपुरात हिवाळ्याच्या तिन्ही महिन्यात प्रदूषणाचा निर्देशांक वाढलेला दिसून आला आणि शुद्ध हवेचे दिवस घटत चालल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबरमध्ये 30 पैकी 28 दिवस प्रदूषणात गेले आणि डिसेंबरचे 31 पैकी 30 दिवस हवेची गुणवत्ता खराब असल्याचे दिसून आले आहे. आता 2023 च्या जानेवारी ते 31 पैकी 31 दिवस  हवा खराब असल्याचे दिसून आले आहे. सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार महिन्याचे 15 दिवस शहर साधारण प्रदूषणाच्या गटात म्हणजेच वायू गुणवत्ता निर्देशांक 50 ते 100 एक्यूआयच्या गटात होता. त्यातील केवळ दोन दिवस हवेची गुणवत्ता समाधानकारक होती. याशिवाय 13 दिवसात हवेचा स्तर 101 ते 200 च्या दरम्यान होता. जो अधिक प्रदूषणाच्या श्रेणीत येतो. 3 दिवस हा स्तर 300 एक्यूआयच्या म्हणजेच धोक्याच्या श्रेणीत गेला. आरोग्यावर घातक परिणाम वाढता प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग, डोळ्यांची जळजळ, एलर्जी यांसारखे आजारसह हृदयरोग सारखे गंभीर रोग उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांक अंतर्गत नागपूरसाठी कृती आराखडा तयार आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या