शुद्ध पाणी देण्यासाठी नागपूर पालिकेनं शोधली नवी पद्धत

 दूषित पाणी हे अनेक आजार होण्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे. 

पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारून शुद्ध पाणी नागरिकांना मिळावं नागपूर महानगर पालिका व ऑरेंज सिटी वॉटरने नव्या कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे. 

शहरातील नागरिकांना आता 96% पर्यंत शुद्ध पाणीपुरवठा होत आहे.

काही वर्षांपूर्वी जलकुंभाची स्वच्छता करताना साधारण 6-7 दिवसांचा कालावधी आणि भरपूर मनुष्यबळ लागत असे.

महापालिका अत्याधुनिक पद्धतीने इन हाऊस प्रेशर सिस्टमच्या माध्यमातून जलकुंभ स्वच्छ करते त्यासाठी आता अवघ्या काहीं तासात जलकुंभाची स्वच्छता होते. 

स्वच्छता मोहिमेमुळे 2012 मध्ये पाण्याची 69 टक्के असणारी गुणवत्ता आता 96 टक्क्यांवर पोहचली आहे.

पाण्याच्या गुणवत्तेत वाढ झाल्याने पाण्यामुळे होणारे आजार कमी झाले आहेत.