JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'स्वत:च्या घरात निष्ठा नसलेल्यांनी...', सुशांत प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा शेवाळेंवर पलटवार

'स्वत:च्या घरात निष्ठा नसलेल्यांनी...', सुशांत प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा शेवाळेंवर पलटवार

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती प्रकरणावरून खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पलटवार केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 21 डिसेंबर : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती प्रकरणावरून खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पलटवार केला आहे. ‘मी त्यांना लव्ह यू मोअर, एवढचं सांगीन. त्या घाणीत मला जायचं नाही, ज्यांची निष्ठा स्वत:च्या घरात नसते, त्यांनी घरामध्ये अनेकवेळा गद्दारी केली आहे, आमच्याशी गद्दारी केली आहे, त्यांच्याकडून आम्हाला चांगल्याची अपेक्षा नाही,’ असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला. ‘या व्यक्तीला मी काडीमात्र किंमत देत नाही. यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं आम्हाला माहिती आहे, मला याच्यात जायचं नाही,’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

काय म्हणाले होते राहुल शेवाळे? लोकसभेमध्ये ड्रग्जच्या विधेयकावरून सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा उल्लेख केला आणि आदित्य-उद्धव असं नाव घेतलं. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबाबतही शेवाळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘ड्रग्ज संदर्भातल्या चर्चेत मी सहभाग घेतला. सुशांत केस तपासाची माहिती जनतेला मिळायाला हवी. रिया चक्रवर्तीचा उल्लेख मी केला, तिला जे कॉल आले होते ते AU यावरून होते, पण मुंबई पोलिसांनी त्याचा खुलासा केला नाही, पण बिहार पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केलाय म्हणून मी प्रश्न उपस्थित केला,’ असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. ‘खरी माहिती समोर आली पाहिजे. मी आज जे बोललो ती AU बाबतची माहिती लोकांपर्यंत कळावी, याबाबत सीबीआयने खुलासा करावा. अनन्या उद्धव का आदित्य उद्धव हे समोर आलं पाहिजे. आदित्य ठाकरे बिहारला नेमके कशासाठी गेले होते, याचाही उलगडा व्हायला हवा,’ अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या