JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur: 81 फोर आणि 18 सिक्स, 13 वर्षाच्या यशनं 40 ओव्हरमध्ये काढले 508 रन! Video

Nagpur: 81 फोर आणि 18 सिक्स, 13 वर्षाच्या यशनं 40 ओव्हरमध्ये काढले 508 रन! Video

नागपूरच्या या 13 वर्षांच्या यशनं एमआय ज्युनिअर अंडर 14 शालेय क्रिकेट स्पर्धेत नाबाद 508 रन करत नवा विक्रम केलाय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 14 जानेवारी :  मुंबईच्या प्रणव धनावडेनं काही वर्षांपूर्वी शालेय क्रिकेटमधील एकाच इनिंगमध्ये तब्बल 1009 रन केले होते. क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातला हा सर्वोच्च स्कोअर आहे. त्याच्या या विक्रमाची आठवण उपराजधानी नागपूरच्या यश चावडेनं करून दिलीय. नागपूरच्या या 13 वर्षांच्या यशनं एमआय ज्युनिअर अंडर 14 शालेय क्रिकेट स्पर्धेत नाबाद 508 रन करत नवा विक्रम केलाय. 81 फोर आणि 13 सिक्स यशनं हा प्रचंड विक्रम फक्त 40 ओव्हर्सच्या मॅचमध्ये केलाय.सरस्वती शाळेचा ओपनर आणि कॅप्टन असलेल्या यशनं फक्त 178 बॉलमध्ये नाबाद 508 रन केले. या खेळीत त्यानं तब्बल 81 फोर आणि 18 सिक्स लगावले. या खेळीसह लहान वयात मोठी खेळी करणाऱ्या प्रणव धनावडे, पृथ्वी शॉ यांच्या यादीत यशनं जागा मिळवलीय. ‘मी माझा नैसर्गिक खेळ खेळत होतो. 250 रन करण्याचं माझं लक्ष्य होतं. इतके रन काढेल असं मला वाटलं नाही. मला ही खेळी कोच रवी कुलकर्णी आणि अन्य सर्व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे करता आली. त्याचबरोबर माझा मित्र आणि ओपनिंग पार्टरनर तिलक वाकोडेनंही चांगला खेळ करत मला भक्कम साथ दिली.’ असं यशनं या विक्रमी खेळीनंतर News18 शी बोलताना सांगितलं. Team India : SKY अन् पृथ्वीला संधी, तर पाच खेळाडू वेगवेगळ्या कारणांनी बाहेर 705 रननं विजय नागपूरच्या झुलेलाल कॉलेजच्या मैदानात ही मॅच झाली. या मॅचमध्ये सरस्वती शाळेनं पहिल्यांदा बॅटींग करत यशच्या विक्रमी खेळीच्या जोरावर 40 ओव्हरमध्ये बिनबाद 714 रन केले. यशला त्याचा ओपनिंग पार्टनर तिलक वाकोडेनं भक्कम साथ दिली. तिलकनं 97 बॉलमध्ये 13 फोरसह 127 रन केले. 715 रनचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदान आलेल्या सिद्धेश्वर शाळेवर नामुश्की ओढावली. त्यांची संपूर्ण इनिंग  5 ओव्हरमध्ये फक्त 9 रन काढून आऊट झाली. सरस्वती शाळेनं ही मॅच तब्बल 705 रननं जिंकत नवा इतिहास रचला.

आमच्या शाळेने आजच्या आजवर अनेक चांगले प्लेयर्स घडवले आहेत. विदर्भाच्या क्रिकेट टीमचा कप्तान फैज फझल, व्हाईस कॅप्टन अक्षय वाडकर याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. यश त्यांचा वारसा पुढे चालवेल, असा विश्वास सरस्वती शाळेच्या क्रिकेट टीमचे कोच रवी कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या