JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई : एका हातात लेकाचा हात, दुसरीकडे छत्री; तेवढ्यात चोरांनी साधला डाव, धक्कादायक Video सीसीटीव्हीत कैद

मुंबई : एका हातात लेकाचा हात, दुसरीकडे छत्री; तेवढ्यात चोरांनी साधला डाव, धक्कादायक Video सीसीटीव्हीत कैद

Mumbai : मुलाला शाळेतून आणताना हा प्रकार घडला. विशेष म्हणजे ती सोसायटीत प्रवेश करीत होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कल्याण, 28 जुलै : कल्याण-डोंबिवलीमधील ठाकुर्ली भागात बालाजी आंगन परिसरात साखळी चोरीचा घटना समोर आली आहे. येथे एका महिलेची चेन चोरण्यात आली. चेन खेचल्यानंतर आरोपी फरार झाले. या आरोपींचं कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याच्या आधारावर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कोरोना काळापासून राज्यातील गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई उपनगरातील ठाकूर्ली भागात साखळी चोरीचा प्रकार समोर आला. येथे एक महिला आपल्या मुलाला शाळेतून घरी घेऊन येत होती. जशी महिला सोसायटीच्या गेटवर पोहोचली तेव्हा बाईकवरुन दोन चोर आले. यातील मागे बसलेला चोर खाली उतरला आणि महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचली आणि लागलीच बाईकवर बसून फरार झाला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यानंतर महिलेने त्या चोरांना पकडण्याचाही प्रयत्न केला. मात्र चोर बाईकवर बसून फरार झाले. या सीसीटीव्हीच्या आधारावर पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या