JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Thane Local Railway : ठाणे-कळव्यामध्ये लोकल ट्रेनवर दगडफेक, प्रवासी गंभीर जखमी

Thane Local Railway : ठाणे-कळव्यामध्ये लोकल ट्रेनवर दगडफेक, प्रवासी गंभीर जखमी

मध्य रेल्वेच्या धीम्या गती मार्गावरील कल्याणकडे जाणाऱ्या लोकलवर अनोळखी व्यक्तीने दगड मारल्याने अनुचीत प्रकार घडला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 08 नोव्हेंबर : ठाण्याकडून कल्याणला जाणाऱ्या मध्य रेल्वेबाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या धीम्या गती मार्गावरील कल्याणकडे जाणाऱ्या लोकलवर अनोळखी व्यक्तीने दगड मारल्याने अनुचीत प्रकार घडला आहे. ही घटना काल (दि.07) सोमवारी रात्री कळवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या घटनेत कळव्यातील बालुदीन गुप्ता (50) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या नाकाला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दगड भिरकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मध्य रेल्वेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमी कोणत्याना कोणत्या कारणाला सामोरे जावे लागत असते. दरम्यान ठाण्याकडे कल्याणच्या दिशेला चाललेल्या संत गतीने जाणाऱ्या लोकलवर कळवा रेल्वे स्थानकादरम्यान एका अज्ञाताने मुद्दाम दगड फेकल्याने एक गंभीर जखमी झाला. यामध्ये कळवा रेल्वे स्थानकात उतरण्यासाठी दरवाज्यात उभे असणारे कळवा पूर्व शांतीनगर येथील बालुदीन गुप्ता (50) यांच्या नाकाला दगड लागल्याने जखमी झाले.

हे ही वाचा :  सिरिअल बनवण्याच्या बहाण्याने अश्लील फिल्म शूट, शहापूरमधील प्रकाराने खळबळ

संबंधित बातम्या

गुप्ता यांना रेल्वे पोलिसांच्या मदतीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. गुप्ता यांच्या दगडाचा मार नाकावर लागल्याने नाकाचे हाड तुटले आहे. त्यांना उपचारासाठी नेले असता त्यांच्यावर उपचार वेळेत न झाल्याने प्रवाशाच्या नाकातून भरपूर रक्त गेल्याचे बोलले जात आहे. डॅाक्टर उपलब्ध नसल्याने मलम पट्टी करुन प्रवाशाला घरी पाठवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर सगळ्यांनीच आक्षेप घेतला.

जाहिरात

दरम्यान या घटनेचा दुजारो देताना, नेमके कशामुळे दुखापत झाली हे स्पष्ट झाले नाही. पण, दगड फेकल्याची शक्यता असल्याने दगड फेकणाऱ्या अज्ञात वक्तीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला असल्याची माहिती ठाणे लोहमार्गाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

हे ही वाचा :  नोकरावर आला जीव, पित्याने केला विरोध; तरुणीचं बापासोबत भयानक कांड

जाहिरात

शिवसेना याला आळा घालणार

काही वर्षांपूर्वी दगडफेकीच्या घटना ठाणे व कळवा दरम्यान जलदगती मार्गावर मोठ्या प्रमाणात घडत होत्या, त्यामध्ये काही महिलांना गंभीररित्या दुखापत होत होती. त्याची दखल घेऊन रेल्वे पोलीस व शिवसेनेच्या वतीने कारवाई करुन त्याला आळा बसला होता. आताही पोलीस व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने दगड फेकणाऱ्या समाजकंटकांविरोधात आजपासून मोहिम राबविण्यात येणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या