मुंबई, 7 नोव्हेंबर : काय दगडासारखा चेहरा करून बसला आहेस? असं आपण अनेकदा उपहासानं म्हणतो. दगड हे आपल्याकडे दुर्लक्षाचे आणि कमीपणाचे उदाहरण आहे. पण, याच दगडामध्ये चेहरा रेखाटण्याचं काम मुंबई तला सुमन दाभोलकर हा तरूण करतोय. गावी नदी किनारी सापडलेल्या दगडांमध्ये त्याला चेहरे दिसले. या घटनेनंतर सुमनचं सर्व आयुष्यच बदलून गेलं. कशी सुचली संकल्पना? सुमन दाभोळकर हा एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. त्याने यापूर्वी कॅनव्हावर सुंदर पेंटिंग्स तयार केल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये गावी असताना नदीच्या किनारी त्याला दगड दिसला. त्या दगडामध्ये त्याला महान शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांचा चेहरा दिसला. त्यानंतर सुमनने आईनस्टाईन यांचे चित्र रेखाटले. या घटनेनंतर त्याला याबाबतची संकल्पना सुचली. सुमनच्या गावी असलेल्या नदीत अनेक मोठे दगड आहेत. त्याने नदीमध्ये उतरून त्या दगडांवर कासव काढला. हे पेटिंग काढताना सुमन त्या दगडाला कोणताही आकार देत नाही. नैसर्गिक आकारातच तो चेहरे रेखाटतो. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त दगडांवर त्याने पेंटिंग्ज काढले आहेत.
अनेक दिग्गजांचे बनवले चेहरे गानकोकिळा लता मंगेशकर, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली अशा अनेकांची चित्रं त्यानं दगडावर काढली आहेत. सुमन सध्या ऑर्डर प्रमाणे चित्र काढतोय. त्याच्या चित्राला देशभरातून मागणी आहे. एका अशी बरीच चित्रपट त्याने बनवली आहेत. सध्या कस्टमाईज पद्धतीने सुद्धा तो चित्र बनवून देतो. संपूर्ण भारत भरातून सुमनच्या कलेला मागणी वाढली आहे. तसंच सध्या तो एका परदेशी व्यक्तीचं सुद्धा चित्र काढतोय. सिटी बजाके बोल… मुंबईकर निखिलनं शिटी वाजवून उंचावली देशाची मान, पाहा Video कसे शोधतो चेहरे? मुंबईकर सुमनला दगडांची निवड करण्यासाठी गावी जावं लागतं. त्यानंतर दगड घरी आणून एखाद्या व्यक्तीचा फोटो समोर ठेवून रंगाच्या कुंचल्यानं तो फेसलाईन बनवतो. त्यानंतर सुमनचे काम सुरू होते. एक चित्र बनवण्यासाठी त्याला 3-4 दिवस लागतात. या पेंटिंग्सचे दर दगडाच्या आकारानुसार बदलतात. 3 हजारांपासून दगडावर पेंटिंग्स बनवून मिळतात. मिनीएचर स्वरूपात सुद्धा दगडावर चित्र बनवून मिळतं. झोपडी ते ताज पॅलेस : ‘मला पैसे नकोत तर…’ कोळीवाड्यातील तरूणाने जिंकलं टाटांचं मन, Video आता या पेंटिंग्सची मागणी वाढली आहे. संपूर्ण भारतभरातून लोकं माझ्याशी संपर्क करत आहेत. दगडाला बोलकेपण द्यायला खूप छान वाटतं. माझ्या गावच्या नदीतला दगड कुणाच्यातरी घरी एका बोलक्या चेहऱ्याच्या स्वरूपात असतो याचंही मनाला समाधान मिळतं, असं सुमन दाभोळकर याने सांगितले. संपर्कासाठी क्रमांक - सुमन दाभोळकर +91 80977 67859