JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दसऱ्या मेळाव्याला शिंदे गटाचा मोठा धमाका, शिवसेनेच्या खासदारासह आमदार लागले गळाला, ठाकरेंना धक्के पे धक्का

दसऱ्या मेळाव्याला शिंदे गटाचा मोठा धमाका, शिवसेनेच्या खासदारासह आमदार लागले गळाला, ठाकरेंना धक्के पे धक्का

एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक हे ऐन दसरा मेळाव्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे.

जाहिरात

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना आणि शिंदे गटाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तीन पैकी दोन निवडणूक चिन्ह हे एक सारखे असल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 सप्टेंबर : शिवसेनेमध्ये (shivsena) बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. अजूनही शिवसेनेमध्ये गळती कायम आहे. दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांच्यासोबत असलेले एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक हे ऐन दसरा मेळाव्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. एकीकडे दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. आता  शिंदे गट ठाकरे गटाला झटका देण्याच्या तयारीत आहे.   दसरा मेळाव्या दरम्यान ठाकरे गटातील अनेक नेते, नगरसेवक आणि काही आमदार शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.  शिंदे गट दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करत आहे. यावेळी खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी हे शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याचे वृत्त आहे. (Shivsena vs Shinde : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत शिंदे गटाची मोठी मागणी, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले एक खासदार, दोन आमदार आणि पाच माजी नगरसेवक हे ऐन दसरा मेळाव्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. या आठ लोकप्रतिनिधींसह एकूण दहा ते पंधरा शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरल्याचं बोललं जात आहे. हा शिवसेनेसाठी मोठा हादरा मानला जात आहे. आधीच शिवसेनेतील 40 आमदार आणि अनेक पदाधिकारी व नगरसेवक हे शिंदे गटात दाखल झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यात आता दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिंदे गटात शिवसैनिक सामील होणार आहे. त्यामुळे ते खासदार आणि आमदार कोण आहे, याची चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या