JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शुभेच्छावरून राजकारण, शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची बाजू, शिंदे-फडणवीसांनी फटकारलं

शुभेच्छावरून राजकारण, शरद पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची बाजू, शिंदे-फडणवीसांनी फटकारलं

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने

जाहिरात

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जुलै : राज्याच्या राजकारणामध्ये कधी काय घडले याचा नेम आता उरला नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळत शुभेच्छा दिल्यात. फडणवीस यांनीही हीच रिघ ओढवली. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचा मान राखत शुभेच्छा दिल्या आहे. (uddhav Thackery birthday) शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत घरोबा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोडी आता चांगलीच जमली आहे. दोन्ही नेते एकत्र पत्रकार परिषदा घेतात आता शुभेच्छा देण्यातही एकत्र आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नसून तर माजी मुख्यमंत्री म्हणून दिल्या आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून तसेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यानंतर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो’ अशा शुभेच्छा दिल्या आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख टाळला आहे.

पण, महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचा सन्मान करत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री . उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! ठाकरे यांना निरोगी दीर्घायु चिंतितो व नव्या भावी संकल्पांसाठी शुभकामना,अशा शब्दांत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या