JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं', भाजपच्या जवळ असलेल्या नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

'शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं', भाजपच्या जवळ असलेल्या नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Sharad Pawar PM ? त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 2 एप्रिल : माजी मंत्री महादेव जानकर यांनी शरद पवार (Sharad Pawar PM) यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधु आणि भाजप सरकारमधील एका मंत्र्यांने अशी इच्छा व्यक्त केल्याचं अनेकांचे डोळे मोठे झाले आहेत. त्यामुळे महादेव जानकर (Mahadev Jankar) राष्ट्रवादीत येणार का, अशाही चर्चेला उधाण आलं आहे. सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. काय म्हणाले महादेव जानकर ? महादेव जानकर म्हणाले की, एसटीच्या सवलती पवार साहेबांनीच दिल्या. आम्ही प्रयत्न केले. धनगर समाजासाठी एसटीच्या 13 योजना मी बनवल्या. 1 हजार कोटी रुपये दिले. मात्र अजून 1 हजार कोटी तुम्ही दिले. त्यामुळे एसटी समाजातील मुले भविष्यात आएएस, आयपीएस होतील. बाप हा बाप असतो आणि नेता हा नेता असतो. मी ही तीन चार आमदार केले. पहिलं आरक्षण शाहूंनी दिलं आणि होळकरांच्या घरी मुलगी देण्यात आलीय. जयंत पाटील तुम्ही आम्ही पाहुणे होऊ शकतो. शरद पवार आपण देशाचे पंतप्रधान व्हावे मी माझी इच्छा आहे. हे ही वाचा- ‘भाजपने ED ला चिल्लर बनवलंय; तपास यंत्रणांचा गैरवापर करून…’, सतीश उकेंच्या अटकेवरुन नाना पटोलेंचा घणाघात व्यासपीठावरुन जानकर यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. त्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे. जानकर भाजप सोडून राष्ट्रवादीत येणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या