JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ..ही लोक महाराष्ट्राचे 5 तुकडे करतील, संजय राऊत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर संतापले, शिंदेंनाही सुनावलं

..ही लोक महाराष्ट्राचे 5 तुकडे करतील, संजय राऊत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर संतापले, शिंदेंनाही सुनावलं

‘कुणाला मुंबई तोडायची आहे, कुणा राज्याची गावं आणि जिल्हे तोडायचे आहे. याचे काम गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू आहे’

जाहिरात

'कुणाला मुंबई तोडायची आहे, कुणा राज्याची गावं आणि जिल्हे तोडायचे आहे. याचे काम गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू आहे'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 23 नोव्हेंबर : ‘राज्यात अत्यंक कमजोर आणि हतबल सरकार बसलेले आहे. त्यांना महाराष्ट्र माहिती नाही, त्यांना महाराष्ट्र समजला नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांवर दावा सांगितला आहे. हे सरकार घालवा नाहीतर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक थांबणार राहणार नाही’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटकनं नवी कुरापत काढली आहे. सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी याच मुद्यावर जोरदार टीका केली आहे. ‘राज्यात अत्यंक कमजोर आणि हतबल सरकार बसलेले आहे. त्यांना महाराष्ट्र माहिती नाही, त्यांना महाराष्ट्र समजला नाही. त्यांनी या प्रकरणावर कोणत्या मुद्यांना वाचा फोडली. ते या खात्याचे मंत्री आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू की पंतप्रधानांशी चर्चा करू असं त्यांनी जाहीर केलं. आता कर्नाटकने जतवर दावा केला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. राज्यात सुद्धा भाजपच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकार आहे. कुणाला मुंबई तोडायची आहे, कुणा राज्याची गावं आणि जिल्हे तोडायचे आहे. याचे काम गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. हे आपले मुख्यमंत्री त्यांच्या 40 आमदारांना गुवाहाटीला चालले आहे. ते तिथून येईपर्यंत एखाद्या जिल्ह्यावर दावा सांगितला नाही म्हणजे मिळवलं, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली. (धनुष्यबाण ठाकरे गटाला मिळणार? निवडणूक आयोगाच्या कोर्टात सेनेचं पारडं जड!) ज्या पद्धतीचे सरकार आले आहे. देशातील राजकीय दरोडेखोरांना वाटतंय, महाराष्ट्राचे लचके तोडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. राज्यपाल करत आहे, भाजपचे नेते करत आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाही, उपमुख्यमंत्री फडणवीस समर्थन करत आहे. बेळगावचा प्रश्न राहिला दूर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांवर दावा सांगितला आहे. हे सरकार घालवा नाहीतर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक थांबणार राहणार नाही, असंही राऊत म्हणाले. काय म्हणाले कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई? कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केली आहे. जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असंही बोम्मई म्हणाले आहे. ( दिशा सालियन प्रकरणी CBIची आदित्य ठाकरेंना क्लिन चीट,राणेंच्या आरोपातून काढली हवा ) पाण्याच्या मुद्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकनं वक्रदृष्टी टाकल्याचं स्पष्ट होतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या