JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मी अखेरपर्यंत.. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मी अखेरपर्यंत.. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

शिवसेना खासदार संजय राऊत यांना 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर ताब्यात घेतलं आहे. यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत यांनी न्यूज 18 शी संवाद साधला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जुलै : शिवसेना नेते संजय राऊत यांना 9 तासांच्या चौकशीनंतर अखेर ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते, अशी देखील माहिती समोर आली होती. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथकं संजय राऊतांविरोधात तपास करत होते. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊतांना याआधी दोनवेळा समन्स बजावले होते. राऊत यांना सध्या ईडी कार्यालयात नेले जात आहे. यावेळी संजय राऊत यांनी न्यूज 18 शी संवाद साधून आपली पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राऊत काय म्हणाले? सकाळपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. राऊत यांना ईडी कार्यालयात नेलं जात आहे. यादरम्यान, राऊत यांनी न्यूज 18 शी संवाद साधला. काहीही केलं तरी मी हार मानणार नाही, मी लढा देत राहीन, अस संजय राऊत बोलताना म्हणाले. यावेळी राजकीय सूडापोटी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. हातात भगवं उपरणं, चेहऱ्यावर दरारा, ईडी अधिकाऱ्यांसोबत बंगल्याबाहेर येतानाचा राऊतांचा पहिला VIDEO सुनील राऊत काय म्हणाले? संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनीही यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. ज्या प्रकारे पत्राचाळी संदर्भात संजय राऊतांना समन्स देण्यात आलं होतं. त्या संदर्भात ईडी अधिकाऱ्यांना एकही कागदपत्र मिळालं नाही. इतर कागदपत्र घेऊन आता आम्हाला ईडी कार्यालयात नेलं जात आहे. मैत्री या बंगल्यात राहणाऱ्या सर्वांची चौकशी केली आहे. सर्वांची कागदपत्र तपासण्यात आली. राऊत यांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवलं तरी संजय राऊत शिवसेना सोडणार नाही, ते अखेरपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचे सुनील राऊत म्हणाले. पक्षाच्या प्रमुख नेत्यावर चुकीची कारवाई होत असल्याने कार्यकर्ते बेभाण झाले आहेत. हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे. उद्धव ठाकरे हे आमच्या संपर्कात आहेत. या कारवाईला आम्ही घाबरणारे नाही. ही सूडबुद्धीने केलेली राजकीय कारवाई असल्याचे सुनील राऊत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या