JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईत दोन आहेत 'गेट वे ऑफ इंडिया', दुसऱ्याचा इतिहास माहिती आहे का? पाहा Video

मुंबईत दोन आहेत 'गेट वे ऑफ इंडिया', दुसऱ्याचा इतिहास माहिती आहे का? पाहा Video

मुंबईची जगभरात ओळख असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ ची प्रतिकृती शहरात आहे. याबाबत मात्र अनेकांना माहिती नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 ऑक्टोबर :  ब्रिटनचे सम्राट पंचम जॉर्ज आणि त्यांच्या पत्नी राणी मेरो यांच्या भारतभेटीच्या निमित्तानं  समुद्रात भराव घालून ‘गेट वे ऑफ इंडिया’ची भव्य कमान उभारण्यात आली. मुंबई चं भव्य प्रवेशद्वार म्हणूनही याची ओळख आहे. मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक ‘गेट वे’ ला भेट देतो.याच गेट वे ऑफ इंडियाच्या एका भागाची हुबेहूब प्रतिकृती मुंबईत आहे. याबाबत मात्र अनेकांना माहिती नाही. या प्रतिकृतीबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. कुठे आहे मिनी गेट वे? 5 ते 6 फुट उंचीची प्रतिकृती मिनी गेट वे या मुंबईतील गावदेवीच्या भेंडी गल्लीत आहे. हा छोटा गेट वे भेंडी गल्लीतच का? याला मोठा इतिहास आहे.  गेट वे ऑफ इंडियाच्या उभारणीत रावबहाद्दूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई यांचा महत्वाचा वाटा होता. यशवंतराव देसाई हे अतिशय हुशार इंजिनियर होते. गेट वे ऑफ इंडियाचे ओव्हरसीअर म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. मुंबईतील अनेक मोठमोठ्या इमारती बांधण्यात देसाई यांचा मोलाचा सहभाग होता. भेंडी गल्लीत यशवंत देसाई यांचा वाडा होता. या वाड्याचील सोनचाफ्याच्या झाडाजवळ ही प्रतिकृती ठेवली होती. गेट वे ञफ इंडिया उभारण्यापूर्वी ही प्रतिकृती उभारण्यात आली होती. याचाच अभ्यास करुन गेट वे ऑफ इंडिया बांधण्यात आले, असा अनेकांचा दावा आहे. कोण होते रावबहाद्दूर देसाई? रावबहाद्दूर यशवंतराव देसाई यांचा जन्म 11 डिसेम्बर 1876 रोजी झाला हे 16 व्या वर्षी असिस्टंट इंजिनिअर म्हणून पी डब्लू डी विभागात 10 रुपये पगाराने नोकरीला लागले. यापूर्वी त्यांचे वडील आणि काका सुद्धा त्याच ठिकाणी कामाला होते.  एलीमेन्ट्री परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर देसाईंना ओव्हरसिअर म्हणून पद मिळाले. देसाई यांचा घुमट बनवण्यात सुद्धा अतिशय उत्तम हातखंडा होता. इंग्रजांच्या काळातील कुशल इंजिनिअर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी रावबहाद्दूर आणि रावसाहेब या पदव्या सुद्धा त्यांना बहाल करण्यात आल्या होत्या. शिक्षकानं करुन दाखवलं, मजूर, मेंढपाळांच्या मुलांना मिळतंय ग्लोबल शिक्षण! Video कशी झाली निर्मिती? 11 मार्च 1911 मध्ये गेट वे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली होती.  1924 साली त्यांचे काम पूर्ण झाले.  ज्या दगडांनी गेट वे ऑफ इंडिया बांधण्यात आला त्याच दगडांनी ही छोटीशी प्रतिकृती उभारण्यात आली आहे.  गेट वे ऑफ इंडियाच्या तीन भागापैकी हा एक भाग आहे मुख्य गेट वे बांधतांना याचा आधार घेऊन बांधलं गेलं असावं अशी माहिती इतिहास अभ्यासक संदीप दहिसरकर यांनी दिली. यामध्ये वापरण्यात आलेला पिवळसर दगड राजस्थानतील असून त्याच्यावर जेवढं पाणी पडणार तेवढा हा दगड टनक आणि पक्का होत जातो. तसंच यशवंतराव यांनी तयार केलेला गेट वे ऑफ इंडिया व प्रतिकृती लॉक सिस्टिम ने बनवण्यात आली आहे. ही छोटीशी वास्तू साडेतीन टन वजनाची आहे.तसंची अगदी रेखीव आणि हुबेहूब कोरीव काम त्यावर करण्यात आले आहे. रावबहाद्दूर यशवंत देसाई यांचे नातू सुहास देसाई यांनी ही छोटीशी वास्तू म्हणजे आपल्या आजोबांची आठवण म्हणून जतन केली आहे. ही वास्तू कधी बांधण्यात आली याविषयी कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ही वास्तू जतन करणं माझं कर्तव्य आहे आणि ते आम्ही देसाई कुटुंबीय पार पाडत आहोत असं सुहास देसाई यांनी सांगितलं. 77 वर्षांच्या आजीबाईंनी स्विमिंगमध्ये पटकावले 3 गोल्ड आणि 2 सिल्व्हर! पाहा Video महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू उभारण्यात ब्रिटिशकाळात मराठी माणसाचं महत्वाचं योगदान आहे. रावबहाद्दूर यशवंतराव देसाई सुद्धा त्याचंच एक उदाहरण आहे.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

मिनी गेट वे कुठे आहे? गावदेवी येथील हरिश्चंद्र देसाई मार्गावरील यशवंत सिद्धी या इमारतीच्या खाली मिनी गेट वे ऑफ इंडिया ही प्रतिकृती जतन करून ठेवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या