JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / CM Eknath Shinde : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी निशाण्यावर; जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली मोठी जबाबदारी

CM Eknath Shinde : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी निशाण्यावर; जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली मोठी जबाबदारी

शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेष म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत युतीसरकारला पाठींबा दिल्याचे सांगितले

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोंबर : मागच्या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत फुटल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतील 40 आमदार फुटून भाजपसोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली. यानंतर शिंदे गटात मागच्या तीन महिन्यांपासून इनकमींग सुरूच आहे. ठाकरे गटातील शिवसेना फुटून एकनाथ शिंदे गटासोबत जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे.  राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेष म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत युतीसरकारला पाठींबा दिल्याचे सांगितले. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी काल भेट घेऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबत नियुक्तीचे पत्र बाळ्यामामा यांना सुपूर्द करण्यात आले. म्हात्रे यांनी युती सरकारला पाठींबा देताच त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गटात शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेतेही सामील होत असल्याने आता राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :  मुलाने खरंच 14 महिन्यात मिळवली पीएचडी? अखेर किरीट सोमय्यांनी केला खुलासा, म्हणाले…

संबंधित बातम्या

याप्रसंगी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी आमदार अशोक पाटील, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर शहरप्रमुख आकाश सावंत तसेच मुरबाड-शहापूर तालुक्यातील सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

दुपारी उद्धव ठाकरेंना भेटले अन् रात्री शिंदे गटात प्रवेश

नवी मुंबईतील उलवे परिसरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा झटका बसला आहे. उरण मतदार संघाचे कार्यकर्ते काल (दि.13) दुपारी उध्दव ठाकरेंना भेटायला गेले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून पाठींबा असल्याचे सांगितले. दरम्यान त्यांना काल रात्री अचानक बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला. उलवे शहर प्रमुख, शाखा प्रमुख, महिला शहर प्रमुख, महिला शाखा प्रमुख यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  अंधेरीचा पेच सुटला, मुरजी पटेलांचा पक्षही ठरला! शुक्रवारी अर्ज भरणार

मागच्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकारणात उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्के बसत आहेत. 40 आमदार फुटल्याने सत्तेतून पायउतार व्हावे लागले. नंतर कालांतराने 12 आमदारांनीही ठाकरे गटाचा पाठींबा काढून घेतला यामुळे राज्यासह केंद्रात आवाज ठाकरेंचा आवाज उठवणाऱ्या खासदारांच्या संख्येतही घट झाली. दरम्यान काल उरण येथील काही शिवसैनिक माजी आमदार मनोहर भोईर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंना झटका दिला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या