मुंबई, 11 ऑक्टोबर : आज नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी राजकीय कोपरखळी मारत त्यांनी मुलाखतीत रंग भरले. याशिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही मनसोक्तपणे प्रश्नांची उत्तर दिलं. यावेळी नानांनी फडणवीसांना दिलेल्या सल्ल्याचीही आठवण करून दिली. फडणवीस सुरुवातील खूप आक्रोशाने आणि उंच स्वरात बोलत असतं. त्यामुळे नानांनी एकदा त्यांना फोन करून हळू बोलण्याचा सल्ला दिला होता.
खूप उंच स्वरात बोलतो तू जर हळू बोल या सल्ल्यानंतर मात्र फरक पडल्याचंही फडणवीसांनी मान्य केलं. आणि यासाठी त्यांनी नानांचे आभारही मानले. नानांच्या सल्ल्यानंतर हळू बोलत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. काय म्हणाले नाना पाटेकर… पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, की भाषण करताना इतका वरचा स्वर लावू नका. त्यानंतर फडणवीस म्हणाले की, माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणानंतर नानांचा फोन यायचा आणि खूप मोठ्याने बोलत असल्याचं म्हणायचे. जरा श्वास घेऊन आणि शांत बोल. त्यानंतर मी तसंच बोलत होतो. मात्र आता मी खूप बदल केला आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांनाही कोपरखळी दिली. ते म्हणाले की, श्वास न घेता बोलण्याचा अधिकार केवळ अजित पवारांचा आहे.