मुंबई, (अमित राय) 05 ऑक्टोंबर : मुंबईतील वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत तर 6 जण जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या सी लिंकवर थांबण्यास मनाई असताना काही गाड्या आज (दि. 05) सी लिंकवर थांबल्या होत्या. त्यावेळी मागून वेगात आलेल्या वाहनांने उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. हा संपूर्ण अपघात CCTV मध्ये कैद झाला असून सोशल मिडियावर वायरल होतं आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 6 जण जखमी आहेत.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर येत आहे तर 6 जण जखमी आहेत. यामध्ये जखमींमधील तिघांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : Jalgaon Crime : अजमेरचा बाबा पावत असल्याचे सांगून दाम्पत्याने लाखो रुपये लुटले
वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात भीषण पद्धतीने झाला आहे दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.
अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमी झालेल्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मागून येणाऱ्या तीन गाड्या धडकल्या. गाड्या एका पाठोपाठ आदळल्याने वाहनांचे जोरदार आवाज झाला. दरम्यान जोरात वाहने आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
हे ही वाचा : VIDEO : किती भयानक आहे हे सगळं! मुंबईत चोरटे बिनधास्त घरात शिरतात, दागिने-पैसे चोरुन नेतात
अपघातानंतर वरळी सी लिंकवर मोठा गोंधळ उडाला होता. या अपघातात जखमी झालेल्या चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.