मुंबई, 20 नोव्हेंबर : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 38 वर्षीय पित्याने आपल्या मुलाची निर्घृण हत्या केली आहे. मुंबईतील मालवणी चर्चजवळ घरात झोपलेल्या अवस्थेत आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी काल (दि.19) शनिवारी पहाटे बापाला अटक करण्यात आली. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी वडील नंदन अधिकारी पोलिस ठाण्यात जात स्वत: कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदन अधिकारी याच्यासोबत पत्नी मुलगी आणि 5 वर्षीय मुलगा असे मालवणी चर्चजवळ राहत होते. दरम्यान नंदनचे अंडी विकण्याचे दुकान होते यामध्ये त्याला त्याची पत्नी मदत करायची. परंतु नंदन हा दुकान चालवण्याऐवजी फक्त झोपत असायचा. यादरम्यान सुनीता आणि तिची मुलगी दुकान सांभाळत होत्या. नंदन अधिकारीच्या या सवयीमुळे घरी पत्नी आणि मुलांमध्ये वाद व्हायचा.
हे ही वाचा : चारित्र्यावर संशय, पत्नीचा चिरला गळा, पुण्यातील भाजी मंडईतली थरारक घटना
आरोपी नंदन अधिकारीची पत्नी सुनीता ही नवऱ्याच्या जाचाला कंटाळली होती परंतु मुलांकडे बघून ती काम करायची. अशातच आरोपी नंदनला धूम्रपानाचे व्यसन होते याकारणावरू पती पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे.
वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, नंदन शनिवारी अंड्याचे दुकान चालवत होता, तेव्हा सुनीता आपल्या मुलीसोबत शाळेत गेली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा झोपला होता. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुनीताला तिच्या सासूबाईंचा फोन आला की, पोलीस तिच्या घरी आले आहेत. हे ऐकून सुनीता काही वेळातच घरी पोहोचली. घरी आल्यावर त्यांना मुलाचा गळा चिरलेला दिसला. त्याच्या शेजारी रक्ताने माखलेला चाकूही पडला होता. हे पाहून सुनीताने हंबरडा फोडला.
हे ही वाचा : धक्कादायक! आधी लग्नाचे आमिष नंतर अत्याचार, धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव टाकणाऱ्या आरोपीला बेड्या
घटनेनंतर आरोपी नंदनने पोलिस ठाण्यात हजर राहत खून केल्याची कबुली दिली. घरातील कलहामुळे नंदनने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस अधिक तपास करत आहेत.