JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kandivali Police Station : पुणेकर तरुणीला 20 लाखांना पडला व्हिसा, काय आहे प्रकरण?

Kandivali Police Station : पुणेकर तरुणीला 20 लाखांना पडला व्हिसा, काय आहे प्रकरण?

व्हिसाच्या मिळवून देण्याच्या नावाखाली एका तरुणीची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत समता नगर पोलिसांच तक्रार दाखल झाली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑक्टोंबर : व्हिसाच्या मिळवून देण्याच्या नावाखाली एका तरुणीची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत समता नगर पोलिसांच तक्रार दाखल झाली होती. यावरून एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. किरण मांडवकर असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तक्रारदार तरुणी ही कांदिवली परिसरात राहत होती. ती वजन कमी करण्यासाठी तिला एका पर्सनल ट्रेनरची गरज होती. दोन वर्षांपूर्वी तिची किरणशी ओळख झाली होती, त्याच दरम्यान तिने आपल्याला कॅनडा येथे जायचे असल्याच किरणला सांगितले. तेव्हा किरणने आपली ओळख असल्याचे सांगून तिच्याकडून 20 लाख रुपये घेत तिची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवली भागात 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मागच्या दोन वर्षांपासून एक तरूणी जीम ट्रेनरकडे जात होती. दरम्यान त्यांची चांगली ओळख झाल्याने तिने आपल्याला कॅनडा येथे जायचे असल्याचं किरणला सांगितले. तेव्हा किरणने आपली ओळख असल्याचे सांगून तिच्याकडून 20 लाख रुपये घेऊन पळून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान याबाबत पोलीस अधिकतपास करत आहेत.

हे ही वाचा :  धक्कादायक! बेपत्ता असलेल्या पणन विभागातील अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला नदीत, साताऱ्यातील घटना

संबंधित बातम्या

पैसे घेतल्यानंतर किरण हा व्हिसा न देताच पळून गेला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी किरण विरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिदे यांनी एक पथक तयार करत ताबडतोब तपास सुरू केला. तपासा दरम्यान याबाबत  किरण पुण्यात दबा धरून बसल्याचे लक्षात येताच पोलीसांनी वेषांतर करून जिमचे प्रोटीन्स विकणारे असल्याचे भासवून पुणे येथून शिताफीने अटक केली.

जाहिरात

दरम्यान किरणवर फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी सराईत असून त्याच्यावर कळवा पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचे गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा :  पुणे: बुधवार पेठेत जायचा अन् दरवेळी 1 दुचाकी चोरायचा; अखेर 6 महिन्यांनंतर अशी झाली पोलखोल

जाहिरात

याचबरोबर तो तीन महीने जेलमध्ये राहून आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने अनेक गुन्हे केल्याचीही माहितीसमोर आली आहे. दरम्यान तो अमली पदार्थ विकत असल्याचाही संशय पोलिसांना आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या