मुंबई, 27 नोव्हेंबर : मुंबईत महानगरपालिका क्षेत्रात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान मुंबईत काही बारमध्ये स्टाटरसाठी कबुतर खायला देत असल्याचा धक्कादायक प्रकार निवृत्त लष्कर अधिकाऱ्याच्या निदर्शनास आला आहे. हा प्रकार कॅप्टन हरिश गगलानी यांनी उघडकीस आणला आहे. त्यांनी मुंबईतील बारमध्ये कबुतरे खायला देत असल्याचा आरोप पोलिसांकडे केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दाखल घेत तक्रार दाखल करून घेतली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे.
हे ही वाचा : कंटेनर भरून खोके कुणी पचवले, एकदिवस…, एकनाथ शिदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तर
कबुतर हे संरक्षित पक्ष्यांचा कक्षेत मोडतात. त्यांचा वापर रेस्टोरंट आणि बारमध्ये खाद्यपदार्थ म्हणून केला जात असेल तर हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याचे गगलानी यांनी म्हटलं आहे. दरम्यान याबाबत मुंबईच्या सायन (शिव) पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पोलीस तपासात लागले आहेत. तक्रारदार निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन हरीश गगलानी यांनी सांगितले की, ते राहत असलेल्या इमारतीच्या छतावर कबुतरांचा आवाज ऐकू येत होते.
एकदा मला संशय आला, मी ते नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र छताला कुलूप होते. त्यानंतर मी पाहिले की तेथे अनेक कबुतरांना पिंजऱ्यात कैद केले आहे आणि कायद्याने असे करणे चुकीचे आहे. मी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर मी महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या पाळीव कबुतरांची हॉटेल आणि बारमध्ये विक्री होत असल्याची माहितीही तक्रारदारांनी दिली.
हे ही वाचा : भूक लागत नाही, भूक मंदावलीय? नक्की करून पहा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय
सेवानिवृत्त लष्कर अधिकारी हरीश गगलानी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संबंधित रेस्टोरंटमध्ये स्टार्टर म्हणून कबुतराच्या वापर होतोय का याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तक्रारीत नमूद करण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास या रेस्टोरंट आणि बार चालकांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.