JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक, एक तरुण फिरत होता जवळ

BREAKING : गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक, एक तरुण फिरत होता जवळ

शहा यांच्याजवळ एक व्यक्ती संशयितरित्या फिरत होता. पोलिसांनी या व्यक्तीला अखेर ताब्यात घेतले आहे.

जाहिरात

शहा यांच्याजवळ एक व्यक्ती संशयितरित्या फिरत होता. पोलिसांनी या व्यक्तीला अखेर ताब्यात घेतले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 सप्टेंबर : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) नुकतेच मुंबईत येऊन गेले होते. पण, त्यांच्या या दौऱ्यामध्ये सुरक्षेत मोठी चुकू झाल्याचे समोर आले आहे. शहा यांच्याजवळ एक व्यक्ती संशयितरित्या फिरत होता. पोलिसांनी (mumbi police) या व्यक्तीला अखेर ताब्यात घेतले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. एकदिवशी दौऱ्यामध्ये त्यांनी लालबागचा राजा आणि भाजप नेत्यांची बैठक घेतली होती. पण, या दौऱ्यादरम्यान, एक व्यक्ती शहा यांच्या जवळपास पोहोचली होती. बऱ्याच वेळ ही व्यक्ती भटकत होती. हेमंत पवार असं या तरुणाचे नाव आहे. हा तरुण धुळ्यात राहणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. हेमंत पवार याने आधी आपण आंधप्रदेश सरकारमधील खासदाराचा सचिव असल्याचे सांगून अमित शहा यांच्याजवळपास फिरत होता. त्याच्या वागणुकीवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असता तो धुळ्याचे असल्याचे उघड झाले. हेमंत पवार हा कशासाठी तिथे आला होता, अमित शहा यांच्याजवळ जाण्याचे कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहे. (शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख) दरम्यान, या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व नेत्यांना आदेश दिले असून 150 जागांचे टार्गेट दिले आहे. तसंच, ‘शिवसेनेनं (shivsena) आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’ असं म्हणत अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या