‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था!
मुंबई, 24 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे विषय बोलायचे सोडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांविरोधात भिडल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र विषय भरकटवण्याचा हा सत्ताधाऱ्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केली आला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सकाळी आमदारांचा गदारोळ पाहायला मिळाला. विधिमंडळाच्या बाहेर नक्की काय घडलं तो घटनाक्रम कसा होता याबद्दल जाणून घेऊया.
अमोल मिटकरी म्हणजे राजकारणाला लागलेला काळा डाग, महेश शिंदेंचा पलटवार
सकाळी 10.15 वाजता - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार हातात बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत होते. सकाळी 10.35 वाजता : विरोधी पक्षांचे आमदार निदर्शने करण्यासाठी आले. विरोधी पक्षनेते अजित पवारही आले. सकाळी 10.40 वाजता - विधान भवनाच्या पायऱ्यांवर खालच्या बाजूला सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार निदर्शने करत होते. त्यांच्या मागे वरच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांचे आमदार निदर्शने करत होते. सकाळी 10.45 वाजता : सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सकाळी 10.50 वाजता : विरोधी पक्षांचे काही आमदार यात अमोल मिटकरी आणि अनिल पाटील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या पुढे निदर्शने करू लागले. सकाळी 10.55 वाजता : सत्ताधारी पक्षातील आमदार महेश शिंदे, महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले यांची विरोधी पक्षांतील आमदार अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांच्यासोबत बाचाबाची सुरू झाली. सकाळी 11 वाजता : सत्ताधारी पक्षांचे आमदार आणि विरोधी पक्षांच्या आमदारांच्या बाचाबाचीचे रुपांतर धक्काबुक्कीत झालं. सकाळी 11.05 वाजता: सत्ताधारी पक्षांचे आमदार आणि विरोधी पक्षांचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. एकमेकांना धक्काबुक्की केली. एकमेकांना हात दाखवून इशारे दिले. एकमेकांना शिवीगाळही करण्यात आला. सकाळी 11.10 वाजता : सत्ताधारी पक्षातील आमदार भरतशेठ गोगावले आणि प्रताप सरनाईक तसेच विरोधी पक्षातील रोहित पवार आमदारांची हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करत होते.