JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Assembly Monsoon Session : मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही, आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली

Maharashtra Assembly Monsoon Session : मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही, आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली

हे सरकार घटनाबाह्य आहे. लवकरच हे सरकार कोसळले, बेईमान आणि गद्दारांचं हे सरकार आहे.

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑगस्ट : ‘आमदार आज गुंडगिरी करत आहे. मला वाटत नाही, खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिला आहे. खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही, तुम्हीच मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. पावसाळी अधिवेशनाला  (Maharashtra Assembly Monsoon Session)अपेक्षेप्रमाणे वादळी सुरुवात झाली आहे. विधानभवनामध्ये विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरे सुद्धा यात सामील झाले होते. ‘हे सरकार आता बदल्यांचं आणि स्थगितीचं झालं आहे. या सरकारला सत्तेचा माज चढला आहे. गुंडगिरीची भाषा वापरली जात आहे. या सरकारला नैराश्य आलं आहे. स्वत: ला काय मिळेल यावरच हे नेते नाराज झाले आहे. आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपद मिळाली आहे, त्यामुळे नाराज आहे. आमच्याकडे असताना जी मंत्रिपदं होती तीच त्यांना परत मिळाली आहे. डाऊनरेड मंत्री झाले आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. ‘शिंदे गटाचे जे निष्ठावंत मंत्री होते, जे पहिल्यांदा सोबत गेले होते. त्यांना काहीच मिळालेले नाही. म्हणजे हे पुन्हा एकदा गद्दारांनी दाखवून दिले आहे की, निष्ठावंतांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ‘हे डरफोकांचं सरकार आहे, ही लोक गुंडागिरीची भाषा करत आहे. ज्या सरकारमध्ये ही लोक गेली आहे. त्या पक्षात गेला आहात तिथे अशी भाषा मान्य आहे का, असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला. हे सरकार घटनाबाह्य आहे. लवकरच हे सरकार कोसळले, बेईमान आणि गद्दारांचं हे सरकार आहे. ज्या लोकांनी आम्ही निष्ठा पाहिली आहे, जे लोकांसोबत, पक्षासोबत एकनिष्ठ राहिले नाही, त्यांना कुणीही स्वीकारणार नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. आमदार आज गुंडगिरी करत आहे. मला वाटत नाही, खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिला आहे. खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही, तुम्हीच मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या