कितीही कोणताही दावा केला तरी फायदा नाही. त्यांना स्वप्नात राहू द्या, ते स्वप्न पाहत असतात.
नवी दिल्ली, 28 जुलै : मंत्रिमंडळविस्तार लवकर होईलच पण मी आणि उमुख्यमंत्र्यांनी जनतेकरता महत्वाचे निर्णय घेतलेला आहे. संजय राऊत यांना त्यांच्या स्वप्नांत राहू द्या, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेत आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर ढाकेंच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. लिलाधार ढाके यांचा प्रवास जवळून पाहिला. बाळासाहेबांसोबत आनंद दिघे़सोबतही ढाकेंचे जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढवण्याचं काम लिलाधर ढाकेंनी केलं त्यांनी स्वत:साठी काहीही केलं नाही जे केलं ते शिवसेनेकरता केले, अशी भावना यावेळी शिंदेंनी व्यक्त केली. ( त्यांनी मला एक सिरिंज दिली आणि 30 विद्यार्थ्यांना…; धक्कादायक प्रकार आला समोर ) मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे, त्यामुळे अशा ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत आहे, प्रत्येकाचाच आशिर्वाद घेणार आहे, असंही शिंदे म्हणाले. ( … आणि पोलीस भरतीचं स्वप्न राहिलं अधुरं; रनिंग करताना कोसळून तरुणाचा मृत्यू ) संजय राऊत यांनी कितीही कोणताही दावा केला तरी फायदा नाही. त्यांना स्वप्नात राहू द्या, ते स्वप्न पाहत असतात. आमचे सरकार 166 आमदारांचे आहे. लोकसभेत सुद्धा आमच्याकडे 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रातही पक्षाकडे बहुमत आहे. सरकार पूर्णपणे मजबूत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या, असा टोला शिंदेंनी राऊतांना लगावला. काय म्हणाले होते संजय राऊत? ‘16 आमदार हे अपात्र ठरणार आहे. त्यांच्यावर 10 व्या सुचीनुसार ही कारवाई होणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्या बंडखोर आमदारांना आपला बचाव करण्यासाठी कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावे लागणार आहे. मग ते स्वत: शिवसैनिक कशाला म्हणता. अशा वेळी किती आमदार मानसिक दृष्टा किती तयार आहे, हे पाहावे लागणार आहे. आमदार आमच्या संपर्कामध्ये आहे. आणि भविष्यामध्ये सत्ता परिवर्तन झाले तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेशी कसा संबंध नाही. सतत ते दिल्लीला यावे लागते, यातून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला किती ठेच लागते, हे आपल्याला कळते. ते सरकार अजून बनवू शकले नाही. त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 सुची आहे, त्यामुळे एक तर 16 आमदारांना अपात्र ठरवले जाईल किंवा दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल. अशा परिस्थितीत हे आमदार स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणून घेतील. बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी कसे म्हणून घेणार हा मोठा प्रश्न आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला.