राजकारणामध्ये कुणी कुणाला संपवण्याची भाषा कधी केली नाही. दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो आधी संपत असतो.
मुंबई, 03 ऑगस्ट : ‘आता आपल्या दोन तीन पातळीवर लढाई सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपण आता कमी पडणार नाही. कोर्टामध्ये आणखी एक सुनावणी होणार आहे. आता तिसरी लढाई ही कागदाची होणार आहे’ असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात तिसऱ्या लढाईचे रणशिंग फुंकले. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. तर दुसरीकडे जळगावमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मातोश्रीवर जमा झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाहेर येऊन भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. ‘आता आपल्या दोन तीन पातळीवर लढाई सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपण आता कमी पडणार नाही. कोर्टामध्ये आणखी एक सुनावणी होणार आहे. आता तिसरी लढाई ही कागदाची होणार आहे. शपथपत्र आणि सदस्यत्व आहे. ते कुठे ठेऊ नका’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. ( अखेर प्रियांका चोप्रा या दिवशी दाखवणार लेक मालतीचा चेहरा; आई मधुने केला खुलासा ) ‘कोर्टामध्ये आपली वकील किल्ला लढवत आहे. माझा न्यायदैवतेवर विश्वास आहे. आजपर्यंत शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले आहे पण आता शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते परवा भाजपच्या अध्यक्षाने बोलून दाखवले आहे. शिवसेना हा संपत चालेला पक्ष आहे, त्यांना कल्पना नाही, शिवसेना अशी आवाहनं पायदळी तुडवली आहे आणि भगवा फडकावला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ‘राजकारणामध्ये हारजीत होत असते. कधी कोण जिंकत असतं, कधी कुणी हारत असतं. पण राजकारणामध्ये कुणी कुणाला संपवण्याची भाषा कधी केली नाही. दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो आधी संपत असतो. जे नड्डा यांचे भाषण वाचले आहे. इतर पक्षांची घराणेशाही आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे. पण भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड आहेत. हायब्रीड आहेत.वंश विकत घेतायत, भाजप कोण आहे ? तर त्यांच्याकडे ३०-३० वर्ष दुसऱ्या पक्षात काम केलेले लोक आहेत. त्यांचे स्वताचे काहीच नाही. त्यामुळे त्यांच्याकडे राजकीय वंशच नाही विचारसरणी नाही.अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली. ( CAT 2022: परीक्षेसाठी आजपासून सुरू झाली नोंदणी प्रक्रिया; ‘या’ IMP गोष्टी वाचाच ) जे मोठे केलेले सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहे. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. भाजपला गुलाब दिसत होते त्यांना कळेल की माझ्याकडे झाड होते, त्याचे गुलाब तुम्ही नेले आता काटे तुम्हाला बोचतील. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन या झाडाला नवे गुलाब येतील, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता टीका केली.