खासदार संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
मुंबई, 24 ऑगस्ट : पत्राचाळ प्रकरणी जेलमध्ये मुक्कामी अससेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून त्यांचे मित्र सुजित पाटकर यांना कोविड सेंटरचे कंत्राद दिल्याच्या आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (kirit somiya) केला आहे. या प्रकरणी पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत आणि सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुंबई महापालिकेतील जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा (mumbai covid center) केल्या प्रकरणी सुजीत पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात किरिट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे. खोटे कागतपत्र दाखवून मुंबई महापालिकेत कंत्राट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांना हे कंत्राट संजय राऊत यांच्या सांगण्यावरून मिळाल्याचा आणि संजय राऊत हे सुजित पाटकर यांचे पाटर्नर असल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला होता. अस्लम शेख यांच्याविरोधातही केली तक्रार दरम्यान, किरीट सोमय्यांनी आता माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी शेख अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण या अनधिकृत स्टुडिओची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. (महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरला भाजपला चित करण्याचा प्लान, जयंत पाटील म्हणाले..) या स्टुडिओच्या बांधकामाला महविकास आघाडीकडून फेब्रुवारी 2021 मध्ये मान्यता मिळाली होती. महाविकास आघाडीचे पर्यावरणमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री यांच्याकडे वेळोवेळी स्टुडिओच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्यांनी या भागाची पाहणी करूनही कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला